
संदेश प्रसारक : अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
आज बौद्ध समाजाने अनेक क्षेत्रात नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे.जवळपास ८५ % समाज साक्षर झाला आहे. हा समाज शिस्तप्रिय देखील आहे यात शंकाच नाही.. परंतु आज आपण पाहतो की, बौद्धांच्या विवाह विधिच्या कार्यक्रमात मात्र कमालीचा उशीर होतो बहुतेक विवाह ३.०० च्या नंतरच लागतात. (काही अपवाद जरुर आहेत). बहुतेक वेळी मात्र आपल्या समाजाची कमालीची बेशिस्त दिसून येते. विवाह वेळेवरच लागावे याचे नियोजन नसते..त्यामुळे इतर समाजबांधव नावं ठेवायला मोकळे होतात.ज्यांना आपण आग्रहाने बोलाविले असते ते लग्न न लावता आहेर देताता.जेवण करतात..न करताही तसेच चालते होतात.याला मुख्यकारण लग्नास आलेले नातेवाईक बघ्याची भूमिका घेतात, नाचणारे गाणारे आदल्या रात्री नाचले तरी वरातीसोबत नाचण्यात जास्त वेळ खर्ची घालतात व वाजंत्री मंडळींवर दबाव आणतात त्यामुळे अजून जास्त उशीर होतो.
काही लग्नात भन्तेजींचे नियोजन नसते किंवा विधी करणाऱ्याला ऐनवेळी सांगितले जाते.त्यामुळे परफॉर्मन्स योग्य होत नाही.तसेच धम्मदान देण्यास का…कू करतात.काही लग्नात ऐनवेळेस सफेदवस्त्र शोधतात त्यामुळेही उशिर होतो. काही लग्नात वर पक्षातील लोकं विवाह स्थळी उशिरा पोहचतात,आदल्या दिवशी उशिरापर्यंत नाचल्यामुळे सकाळी जाग येत नाही त्यामुळे उशीर होतो. काही लग्नात पूजेसाठी लागणारे साहित्य ऐनवेळी शोधावे लागते.म्हणून लग्नात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने लग्न लवकर कसे लागेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी खालील प्रमाणे उपाय योजना केली पाहिजे (१)आपल्याकडे विवाह असल्यास अगोदर पू.भन्तेजी किंवा बौध्दाचार्य यांच्याशी संपर्क करुन त्यांच्या तारखा घेऊन विवाह पत्रिकेत विधी संचालनः- म्हणून त्यांचे नाव पत्रिकेत नमूद करावे.. तसेच विवाहाच्या आदल्या दिवशी पुन्हा संपर्क करुन…पुजा विधी साहित्याची यादी घ्यावी. (२) विधी उपासक/बौध्दाचार्य /पू. भन्ते यांनी नमूद केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी उपस्थित राहून पूजा स्थानाची मांडणी करुन घ्यावी.माईक व्यवस्था पाहून घ्यावी. विवाहाची वेळ झाल्यावर माईक वरुनसूचना द्यावी.व जाणीव करुन द्यावी.
(३) वर पक्षाकडील मंडळींनी वधूपक्षाकडे किंवा नियोजित लग्नस्थळी वेळेवर पोहचलेच पाहिजे याबाबत दोन्ही ही पक्षाच्या वरीष्ठ मंडळीनी पुढाकार घेऊन नियोजन करावे.
(४) विवाहस्थळ व नवरदेव (वर) घोडयावरून येण्याचे ठिकाण अतिशय जवळ निवडले पाहिजे.
(५) विवाहस्थळी पोहचल्यावर शुभ्रवस्त्र परिधान करण्यासाठी योग्य व्यवस्था तिथेच करावी.
(६) मंडपात स्टेज जवळ अगोदरच माईक ची व्यवस्था करावी काहीवेळेस बँडवाल्यांकडून व्यवस्था करावी लागते… त्यामुळे गोंधळ उडतो.केबलची वायर छोटी असते.
(७) वधूचे माता पिता व वराचेमाता पिता यांनी स्टेजजवळ उपस्थित रहावे.
(८)बसलेल्या लोकांना लगेच फुल किंवा फुलांच्या पाकळ्या वर्षाव करण्यासाठी द्याव्यात..
(९) आलेल्या कोणत्याही पाहुण्यांचा सत्कार स्टेजवर करू नये, फक्त शब्दसुमनानी स्वागत करावे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही..
(१०) वरात रस्त्यावर असतांना दोन शहाणे पुरुष बँड वाले लवकर कसे पोहचतील याची काळजी घेणारे असावेत.
(११) नाचणाऱ्यांना थोडी मुरड घालावी.
(१२) लग्नविधी करणारा बौद्धचार्य अनुभवी असावा म्हणजे लग्नात गोंधळ होत नाही.
(१३) पू.भन्तेजी/विधी उपासक/ बौद्धाचार्य व्यक्तीला निमंत्रण पत्रिका अगोदर देऊण आमंत्रण द्यावे.
(१४) दारूपीऊन धिंगाणा करणाऱ्या नातेवाईकांना जाणीवपूर्वक योग्य शब्दात समजावून सांगावे.
(१५) लग्न मंडपात विधी चालू असतांना पूर्णपणे शांतता राखावी.
(१६) शक्यतो लग्न लावण्यापूर्वी पंगती बसतील अशी व्यवस्था करावी.शहरात बफेची व्यवस्था असते.
(१७) दोन्ही ही पक्षांनी पूर्ण समजूतदारपणे लग्न वेळेवर लागेल याची काळजी घ्यावी
(१८) शक्यतोवर विवाहाची वेळ १२.०० ते १२.३० पर्यंत द्यावी.वधू.वरांच्या किंवा घरातील मंडळीच्या इच्छे नुसार सायंकाळची वेळ ७.ते ७.३० पर्यतची द्यावी..
(१९) काही कारणाने विलंब होत असेल तर विवाह पुर्वी भोजनाची सुरूवात करावी..
(२०) विवाह विधि करणारा बौद्धांचार्य हा भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यप्रणाली नुसार प्रशिक्षित असावा…
अश्या काही व इतर उपाययोजना केल्यास विवाह विधि लवकर किंवा वेळेवर लागतील,तसेच वर व वधू पक्षाने ठाम निर्णय घेतल्यास वेळेवर लग्न लागतील. इतर समाजाने नावं ठेवू नये यासाठी विवाहविधी वेळेवर लावण्यासाठी प्रत्येक बौद्ध व्यक्तीने प्रयत्न केले तर आपले विवाह आदर्श विवाह ठरतील.
केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजेत या उक्तीप्रमाणे मी माझ्या मुलगा व मुलीचं लग्न दिलेल्या वेळेनुसार लावले, अंधश्रद्धा निर्मूलन म्हणून पौष अमावास्याला केले,आज सुखी आहेत, तसेच मी संविधान प्रचारक/प्रसारक असल्याने महामानवाच्या प्रतिमा साक्ष ठेवून २२ प्रतिज्ञा वदवून घेतले नंतर संविधान उद्देशिकाचे वाचन करून मंगल परिणयाला सुरुवात केली.
या मंगल परिणयात हळदीचा कार्यक्रम घेतला नाही,आहेराच्या स्वरूपात युगप्रवर्तक विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रात्मक पुस्तक भेट देले.
मनात इच्छा असेल तर सर्व काही होऊ शकते, फक्त मनाची तयारी पाहिजे.
वरील मार्गदर्शक माहिती योग्य वाटत असेल तर इतरांना शेअर करा..
धन्यवाद…! नमोबुद्धाय जयभिम…!! जय संविधान!!! जय भारत….!!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत