
आयोजित परिषदेत संरक्षण उद्योगातील नेते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. भारत ब्रिटनसोबत सहकार्य, सहनिर्मिती आणि सह-नवीनीकरणासाठी समृद्ध भागीदारीची अपेक्षा करतो, असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ब्रिटनचे संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स यांच्याशी लंडनमध्ये संवाद साधला. ब्रिटन मधल्या संरक्षण क्षेत्रातील उद्योग प्रमुखांनी भारतासाठी त्यांच्या सध्याच्या आणि भविष्यातील योजनांची रूपरेषा सांगितली. या परिषदेला ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, ब्रिटन – भारत उद्योग परिषदेचे अध्यक्ष आणि सीआयआय इंडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच या परिषदेत एरो-इंजिन, इलेक्ट्रिक प्रोपल्शन, क्षेपणास्त्र, पॉवर-पॅक आणि सागरी प्रणाली या क्षेत्रात संयुक्तपणे कार्य करण्याविषयी सविस्तर चर्चा झाली. यावेळी राजनाथ सिंह यांनी ब्रिटनच्या संरक्षण उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन केले. दरम्यान राजनाथ सिंह यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेऊन संरक्षण, व्यापार, प्रादेशिक मुद्दे तसेच भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार आदी द्विपक्षीय मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत