शरद पवार – अजित पवार यांची आज पुण्यात होणार महत्त्वाची बैठक.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांनी गुप्तपणे पुण्यात भेट घेतली होती. मात्र फुटीनंतर सार्वजनिक रित्या दोघेही एकत्र आले नव्हते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे अध्यक्ष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार आज पुण्यामध्ये एका बैठकीसाठी एकत्र येणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची शुक्रवारी मांजरी इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या संचालक मंडळाची याआधी एक बैठक झाली होती. अजित पवार त्या बैठकीला गैरहजर होते. मात्र त्याच दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी भेट झाली होती. त्या गुप्त भेटीची चर्चा पुढे बरेच दिवस सुरू होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत