” इंग्रजांना वाईट का म्हणून बोलावे ??

अर्धवट इतिहास माहिती असणारे लोक इंग्रजांना खूप वाईट म्हणतात व त्यांना अतिशय घाणेरड्या शिव्या शाप देतात. परंतु आपल्या ओबीसी समाजात जन्मलेले महान क्रांतिकारक महात्मा फुले यांनी सांगितले होते कि, ओबीसी(शूद्र) व अतिशूद्र लोकांसाठी इंग्रज भगवान बनून आलेले आहेत… ते जोपर्यंत आपल्या देशात आहेत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत, तेव्हा जास्त प्रमाणात शिक्षण घ्या.
याच अर्थ असा कि SC/ST/OBC/Minority यांचे खरे दुश्मन इंग्रज नाहीत; तर मनुवादी आहेत. ज्यांनी ह्या लोकांना हजारो वर्ष सत्ता, सम्पती, सन्मान यापासून दूर ठेवून शोषण केले आहे. अतिशुद्रांना यांच्या धार्मिक गुलामी पासून मुक्ती पाहिजे असेल तर बामन वादाने थोपविलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा याची चिकित्सा करून त्या नाकारणे योग्य ठरेल.
आम्ही या ठिकाणी माहिती देत आहोत. जरूर वाचा… इंग्रजांनी किती कर्मकांड व पाखंड यावर बंदी घालण्यात यश मिळवले. प्रथा-परंपरा ह्या माणसाला जनावर प्रमाणे वागणूक देत होते. त्यांचे प्राण घेत होते. हे इंग्रजांना मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटत नव्हते…!
जरूर लक्षपूर्वक वाचा :
१) रथयात्रा : जगन्नाथपुरी मध्ये तीन वर्षातून एकदा ही रथयात्रा काढली जाते. स्वर्ग पाहाण्याच्या नादात किती लोक त्या रथाच्या चाकाखाली येवून मरत होते, हे कायदा बनवून बंद केले ।
२) काशीकर बट : काशी धाम मध्ये इश्वर प्राप्ति करण्यासाठी विश्वेश्वर मंदिर जवळ तलावात उडी मारून लोक मरण पत्करत होते, हे बंद कण्यात आले ।
३) चरक पूजा : काली मातेचे मोक्षाभिलाषी उपासक पाटीच्या कण्यात लोखंडाचा हुक अडकवून व वरती लटकवून चर्खी मध्ये जोरजोरात फिरवले जात होते. जोपर्यंत त्याचे प्राण जात नव्हते हे पाखंड 1863 कायदा बनवून बंद केले ।
४) गंगा प्रवाह : जास्त वेळ होऊनही मुल होत नाही म्हणून गंगा नदीला नवस बोलणे व पहिले झालेले निष्पाप मुल त्या गंगा नदीत सोडून देणे, किती निर्दयी व कठोर काम हे, 1835 मध्ये कायदा बनवून बंद केले ।
५) नरमेध यज्ञ : ऋग्वेदाचा आधार घेवून अनाथ किंवा निर्दयी मुलांना यज्ञ मध्ये बळी द्यायची भयानक व अघोरी प्रथा 1845 मध्ये एक्ट 21 बनवून बंद केले ।
५) महाप्रस्थान : पाणी मध्ये जलसमाधी घेणे किंवा स्वतःला अग्नी मध्ये उडी घेवून ईश्वर प्राप्तीच्या इच्छिणे आपले जीवन संपवून टाकणे हि प्रथा कायदा बनवून बंद केली ।
७) तुषानल : कोणत्याही पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी लाकडी भुसा किंवा गवताच्या आगीत जाळून भस्म होणे या प्रथेला कायदा बनवून बंद केले ।
८) हरिबोल : हि परंपरा बंगाल मध्ये प्रचलित होती. मरणासन्न व्यक्तिला लाथाबुक्यांनी मारणे व हरीबोल च्या घोषणा देणे, जो पर्यंत तो माणूस मरत नाही तो पर्यंत मारणे, जर तो माणूस मेला नाहीच तर त्याला तेथच तडफडत सोडून येत होते अशा माणसाला पुन्हा घरात घेत नसत 1831 मध्य कायदा बनवून हि परंपरा बंद केली.. ।
९) नरबळी : आपल्या इच्छाप्राप्तीसाठी आल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मानवाची सरळ बळी देण्यात येत असे, ही भयानक प्रथा इंग्रजांनी बंद केली. परंतु काही ठिकाणी आजही ही प्रथा जिवंत आहे. “बळी” मात्र बदलला आहे ।
१०) सतीदाह : पती मेल्यानंतर पेटत्या प्रेतावर पत्नीने उडी घेणे व “सती” जाणे हि भयानक परंपरा . 1841 मध्ये इंग्रजांनी बंद केली ।
११) कन्यावध : उडीसा व राजपूताना मध्ये कुलीन क्षत्रिय कन्या जन्म घेताच मारून टाकत होते कारण त्यांना भीती वाटत होती की पुढे सासरा किंवा मेव्हणा बनावे लागेल, ही परंपरा 1870 मध्ये कायदा बनवून बंद केली ।
१२ ) भृगुत्पन्न : ही प्रथा गिरनार व सतपुडा येथे प्रचलित होती. माता नवस करायची की, हे महादेव..! मला झालेली पहिलं संतान मी तुला अर्पण करेन, यानुसार पुढे नवीन युवक डोंगरावरून उडी मारून आपला जीव देत असत ही प्रथा कायदा बनवून बंद केली.
ह्या परंपरा ब्राह्मणी धर्मानुसार बनविलेल्या होत्या, त्या इंग्रजांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून बंद केल्या. विचार करायला हवा की एवढा अत्याचार आपले लोक सहन का करीत होते…काय होती ही गुलामी ??
कधी विसरणार तर नाही ना आम्ही ??
देशातील रेल्वे, विमान, मोठ-मोठी प्रकल्प, हे त्यांच्याच काळात आले आहेत..
ओबीसी जागा हो….प्रबोधनाचा धागा हो
✅मंदिर मस्जिद नको.. स्कूल पाहिजे !
✅प्रथा-परंपरा नको.. अधिकार पाहिजे !! “
उद्या 11 एप्रिल ! राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
सामाजिक क्रांतीची मशाल म.फुले यांनी पेटविली. त्या मशालीत राजर्षी शाहू तेल होऊन जळत राहिले. पुढे ती मशाल राजर्षीनी मानगाव परिषदेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधिन केली.
पुढील इतिहास तर सर्वज्ञात होय.
फुले-शाहूंना बाबासाहेबांनी संविधानाच्या कोंदणात बसवलं…!
म्हणूनच थोडं फार ठीक आहे…
बिसवी सदी गांधी की थी…
21वी सदी हमारी है !!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत