नळदुर्ग शहरात ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात झाडांना मिळाले जीवदान
नळदुर्ग येथील मैलारपूर कट्टा मित्र परिवाराचा आनोखा उपक्रम
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
सध्याचा कडक उन्हाळ्यात तापमान दिवसेनं दिवस वाढतच आहे आशा महा भयानक उन्हाळा पाहुन नागरीक हैरान झाले आहेत . मानवा बरोबर झांडाना ही जीवदान देण्याची खुप गरज आसल्यामुळे नळदुर्ग येथील वृक्षमित्र पद्माकर घोडके यांच्या संकल्पनेतील वृक्ष लागवड नळदुर्ग शहरात खुप मोठ्या प्रमाणात झाली ही वृक्ष जिवंत राहाण्यासाठी नळदुर्ग येथील मैलारपूर कट्टा मित्र परिवाराचा आनोखा उपक्रम हाती घेतला आणि दोन दिवसा आड टँकरने वृक्षाना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला नळदुर्ग शहरात बसंस्थानक ते बाजारात जाणारा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला , नगर परिषद कार्यालय कडे जाणारा रस्ता या दोन्ही बाजुला , बालाघाट कॉलेज ते डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक , आदी शहरात ठिक ठिकाणी वृक्ष लागवड झाली आहे त्या ठिकाणी या झांडाना पाणी मिळाले पाहिजे कारण झाडे सुद्धा या उन्हाने तळपळत आहे मानव कसा पण जगेल पण मानवाला जगण्यासाठी वृक्षाची गरज लागते म्हणून पद्माकर घोडके यांची संकल्पना व मैलारपूर कट्टा परिवाराच्या वतीने खुप मोठा उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पार केला आहे
पुर्ण उन्हाळा संपे पर्यंत दर दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचे आणि झाडे जगविण्याचा संकल्प मैलारपर कट्टा मित्र परिवाराने वृक्षाना पाणी देत आसताना नळदुर्ग नगरीचे माजी नगराध्यक्ष उदय भाऊ जगदाळे , सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास अंहकारी , नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सचिव तानाजी जाधव , डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा रिपाईचे नळदुर्ग शहर अध्यक्ष मारुती खारवे , माजी नगरसेवक विनायक अंहकारी , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , माजी नगरसेवक सुधिर हजारे , पद्माकर घोडके , पत्रकार उत्तम बनजगोळे , पत्रकार दादासाहेब बनसोडे , सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे ,पत्रकार मित्र अमर भाळे यांच्या सह नागरीक उपस्थित होते . हा उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पार होत आसल्यामुळे सर्वांचे अभिनंदन व कौतुक होत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत