CBSE प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता सहावी, नऊवी आणि आकरावी साठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मंजुरी
नवी दिल्ली: Ph. D च्या धर्तीवर आता माध्यमिक शालेय शिक्षणात सुध्दा क्रेडिट प्रणाली लागू करण्यासाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर yaa वर्षी पासून म्हणजेच 2024-25 पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत.
CBSEने शाळेच्या शिक्षकांना लिहलेल्या एका पत्रात म्हटलं आहे की, CBSEने NCRFच्या सूचनेनुसार एक मसूदा जारी केला आहे. त्यावर अनेक कार्यशाळांसोबच चर्चा केल्यानंतर आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मंजूरीदेखील मिळवली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांची प्रायोगिक अंमलबजावणी त्यांच्या परिणामकारकतेची चाचणी आणि मूल्यांकन करण्यासाठी केली जाईल. सीबीएसई संलग्न शाळांमध्ये सत्र 2024-2025 साठी इयत्ता 6 वी, 9 वी आणि 11 वी या इयत्तांमध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क राबविण्याची योजना आहे.
सीबीएसईने पुढे पत्रात नमूद केले आहे की, प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या या कार्यक्रमासाठी इच्छुक असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक याबाबत माहिती देऊ शकतात. विद्यार्थी वर्गातील वाचन, प्रयोगशाळेतील काम, प्रकल्प, खेळ, परफॉर्मिंग आर्ट्स, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC), सामाजिक कार्य, व्यावसायिक शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षण, ज्यामध्ये संबंधित अनुभव आणि व्यावसायिक स्तराचा समावेश आहे, यातून ‘क्रेडिट’ मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी कमावलेले ‘क्रेडिट’ त्यांच्या ‘Academic Bank of Credit’ (ABC) मध्ये जमा केले जाईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत