काक्रंबा येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

धाराशिव : 6 एप्रिल 2024 रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दलाचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर मेजर ऍडव्होकेट अनिल कांबळे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष विजयमालाताई धावारे, जिल्हा कोषाध्यक्ष राजश्रीताई कदम, वसंत मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर सकाळी 10.30 ते सायंकाळी 06.30 या कालावधीमध्ये संपन्न झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,6 मार्च 2024 रोजी मौजे काक्रंबा तालुका तुळजापूर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी ठीक 10.30 वाजता महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ऍड.मेजर अनिल कांबळे यांनी दिवसभरामध्ये 10.30 ते दुपारी 02.00 पर्यंत लाठी-काठी शिक्षण प्रशिक्षण आणि दुपारच्या सत्रामध्ये समता सैनिक दलाची गरज या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये मौजे काक्रंबा येथील जवळपास 40 तरुणांनी व महिलांनी सहभाग नोंदविला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे,उस्मानाबाद तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड,तुळजापूर महिला विभागाच्या उपाध्यक्ष लक्ष्मीताई कदम समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सरतापे,विठ्ठल सुरते,वैभव शिरसाट,यांची प्रमुख उपस्थिती होती.तर या समता सैनिक दलाच्या या एकदिवसीय मार्गदर्शन शिबिरासाठी उमेश पांडागळे शुभांगी साबळे,राणी मस्के,सत्यशीला पांडागळे,सोनाली मस्के,दयानंद मस्के यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत