दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

बहुजनांनो, छत्रपती संभाजी राजेंच्या हत्येचा दिवस तुम्ही “गुढीपाडवा” म्हणून साजरा करणार का ?


औरंगजेबाने संभाजीराजे प्रमाणे कोणालाही ठार केले नव्हते . शंभू राजेंना एका घावात ठार मारण्याऐवजी वेगळी शिक्षा का देण्यात आली असावी ?

प्रथम संभाजीराजेंची जीभ कापण्यात आली , कारण संभाजीराजे नी संस्कृत वर प्रभुत्व मिळवले होते . वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी राजेंनी सातसतक , नायिकाभेद , नखशिखांत व बुद्धभूषण असे चार ग्रंथ लिहिले होते . ब्राम्हणांनी शूद्र अतिशूद्रांना वेद ऐकण्याचा , बोलण्याचा व शिक्षणाचां अधिकार नाकारला होता . संभाजी राजे मनुस्मृती नुसार शूद्र होते .त्यांनी संस्कृत मध्ये वरील ग्रंथ लिहिलेच का ? याचे शल्य बामनांनां होते .त्यांनी संभाजी राजेंना कपटाने पकडून औरंगजेबाच्या हवाली केले .

संभाजी महाराजांनी मनुस्मृती उखाडून फेकून दिली होती . म्हणूनच प्रथम त्यांची जीभ कापण्याचा सल्ला ब्राम्हण सल्लागारांनी दिला . नंतर राजाचे क्रमशः कान , डोळे व त्वचा काढण्यात आली .ही निर्दयी शिक्षा मनुस्मृती संहितेप्रमाणे देण्यात आली . म्हणजेच औरंगजेबाच्या माध्यमातून संभाजीराजेनां ही शिक्षा ब्राम्हणांनीच दिली .
औरंगजेबाने संभाजी महाराजांनां धर्मद्वेषाने ठार मारले नसून राजकीय संघर्षामुळे ठार मारले . औरंगजेबाने शंभू राजेंना फक्त दोनच प्रश्न विचारले होते की , तुमच्या खजिनाच्या चाव्या कुठं आहेत ? आणि माझ्या सरदारांपैकी तुम्हाला कोण फितूर झालेले आहेत ? याचाच अर्थ म्हणजे औरंगजेबाने संभाजीराजे ना धर्मांतराचा आग्रह कधीच धरला नव्हता . माझ्या मुलीशी विवाह कर आणि मुसलमान हो ! असे कधीच औरंगजेबाने सांगितले नव्हते कारण औरंगजेबाची मुलगी संभाजी राजे पेक्षा वयाने १६ वर्ष मोठी होती . आणि औरंगजेब हा मुसलमान नसून ” मोगल ” होता . मोगलांचा धर्म हा ” ईल इलाही ” हा होता . परंतु ब्राम्हणांनी संभाजी राजेंचा चुकीचा इतिहास बहुजनांचा माथी मारला .

संभाजीराजे ची हत्त्या झाल्या नंतर पुण्यातील बामनांनी राजेंच्या मस्तकात टोकदार भाला घुसवून पुण्यात मिरवणूक काढली व देहाचे तुकडे तुकडे करून पुण्यातील ” वडबुद्रुक ” तेथील शेतात फेकून दिले .तेव्हा या गावातील गणपत महार यांनी महाराजांचे प्रेताचे तुकडे गोळा केले व गोविंद चांभाराने हे प्रेत शिवून अंत्यविधी केले .
संभाजीराजे च्या प्रेताच्या मस्तकात भाला घुसवून भटांनी पुण्यात मिरवणूक काढून बहुजनांना एका प्रकारे चेतावणीच दिली . आमच्या विरोधात जाल तर तुमच्या राज्याप्रमाणे तुमचे ही असे हाल करू!!!
ब्राम्हणांनी अशी मिरवणूक काढून आनंदोसत्व म्हणून गुढीपाडवा सुरू केला .

भारताचा महाराष्ट्र वगळता ईतर राज्यात गुढीपाडवा का साजरा होत नाही ??
आपल्या मूलनिवासी – बहुजन महापुरुषांचा हत्येचा दिवस आपण सण म्हणून का साजरा करावा ???
त्योहार म्हणजेच तुम्हारी हार !!
आता माझा तुम्हाला एकच शेवटचा प्रश्न आहे , जर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज जर का मुस्लिम विरोधी होते तर त्यांचा नंतर मुस्लिमांचे राज्य आले पाहिजे होते पण छत्रपती शिवराय व संभाजीराजे च्या हत्येनंतर मुस्लिमांचे राज्य येण्याऐवजी पेशवे – ब्राम्हणांचे च राज्य कसे काय आले ???
छत्रपती शिवराय व संभाजीराजे ची हत्त्या करून ब्राम्हणांनी समतावादी शिवशाही संपवली व पेशवाई निर्माण करून मूलनिवासी – बहुजनांवर अन्याय – अत्याचाराचा कळस गाठला व अतिशूद्रांच्या गळ्यात मडके व पाठीमागे झाडू आला .
स्वातंत्रवीर संभाजीराजेना विनम्र अभिवादन !

संदर्भ : चर्मकारांचे शत्रू कोण ?
पुष्ठ : ३१
लेखक : प्रकाश काशीनाथ समशेर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!