निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

पक्षीय व्यभिचाराला राजमान्यता नको म्हणत बिनशर्त पाठिंबा ! – राज ठाकरे यांची गोंधळात टाकणारी भूमिका

मुंबई : लोकसभा 2024 च्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते कारण ते दिल्लीला जाऊन शहांची भेट घेऊन आले आहेत. पण अद्याप प्रत्यक्ष प्रचारात न उतरल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत भूमिका स्पष्ट करताना विरोधाभासी भूमिका घेतल्याचे दिसले.

आपली भूमिका स्पष्ट करत ‘लोकसभेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला. आपल्याला कमळ या चिन्हावर लोकसभा लढवावी असे सुचवले होते परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्या हाताखाली काम करणार नाही आणि इंजिन हे चिन्ह कार्यकर्त्यांच्या कष्टाचं आहे म्हणून नकार दिला असे सांगत ‘या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे,’ म्हणून, ‘भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला फक्त नरेंद्र मोदींसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देत आहे, आता जरी पाठिंबा दिला असला तरी भविष्यात वेळ आली तर आपण आपले तोंड उघडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या.

देशातील तरुणाईकडे मोदींनी लक्ष द्यावे, राज्याला कर वसुलीच्या प्रमाणात हिस्सा मिळवा या सोबतच सध्याचे राजकारण विचित्र पद्धतीने चालू आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. व्यभिचाराला तुम्ही राजमान्यता देऊ नका. महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे, त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत’, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. मुळात महाराष्ट्रातील सरकार पक्षीय व्यभिचाराचे उदाहरण आहे. सभेतून ज्या गोष्टीला विरोध त्याच गोष्टीला पाठिंबा दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात एकूणच संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली.

‘निवडणूक आयोग आपली एक समांतर फळी का उभारत नाही’, असा प्रश्न उपस्थित करत, नर्स आणि डॉक्टरांनी निवडणुकींच्या कामावर जाऊ नये, तुम्हाला कोण नोकरीवरून काढतो, ते मी पाहतो, असा थेट इशाराच निवडणूक आयोगाला दिला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!