दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

अंबरनाथ नगर परिषदेवर भटक्या विमुक्त समाजाचा मोर्चा

राहुल हंडोरे अंबरनाथ दि. 20 मे 25
नागपंथी डवरी गोसावी भटके विमुक्त सेवा संघ व राजे उमाजी भटके विमुक्त आदिवासी इतर मागासवर्गीय संघटना यांचे वतीने भटक्या समाजाच्या विविध मागण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

अंबरनाथ मधील सर्कस मैदान येथील 530 कुटुंबाचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे, घरांना टॅक्स लागू करण्यात यावा, या ठिकाणी पायवाटा तयार करण्यात याव्यात, पाणी आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्यासाठी नागपंथी डावरी वोसावी समाजाचे अध्यक्ष भीमराव इंगोले, राजे उमाजी भटके समाजाचे अध्यक्ष कैलास भंडालकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे पोतराज उघड्या अंगावर असुडाचे फटके मारत चालले होते. तर गोंधळी सामाजचे लोक डफडे वाजवत, महिला काठीने ढोलक वाजवत तर सारंगीवाले सारंगी वाजवत मोर्चात चालले होते.

मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड, अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी, रिपाई महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे, समाजसेवक सिद्राम कांबळे, पोतराज समाजाचे नेते दादू पोतराज, साहिनाथ पोतराज, गोंधळी समाजाचे दत्ता चव्हाण, सारंगीवाले पटलाजी राठोड, महिला प्रतिनिधी अंजम्मा, शान्तम्मा, द्वारका हजारे, भटक्या समाजाचे सुनील सकट, ओगले, पळसपगार, भालेराव आदी. कार्यकर्ते मोर्चात सामील झाले होते.

सात दिवसाच्या आत भटक्या समाजाचे प्रश्न सोडविले जातील असे लेखी आश्वासन नगरपरिषदे मार्फत देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!