
बौद्ध संस्कारा नुसार पुजा पाठ पुस्तकाचे करण्यात अले वाटप
नळदुर्ग .
दादसाहेब बनसोड
प्रत्येक ठीकाणी हळदी कुंकू हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत आसल्याचे दिसुन येत आहे खुप मोठ्या प्रमाणात महिलांचे सुसंवाद वाढत आहेत संघटन ही वाढत आहे तर दुसरीकडे तुळजापूर तालूक्यात जळकोट गावात त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बौध्द संस्काराचे जतन आणि पठण हाव्हे यासाठी जळकोट गावातील महिला ७ फेब्रुवारी पासुन पंधरवाडयात विविध विषयाला अनुसरून तेथील बौध्द महिला मात्र बौद्ध संस्कार आणि बुद्ध त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करून बौद्ध संस्काराचे बौद्ध पुजा पाठ पुस्तकाचे वाटप करून विविध उपक्रमाने माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .
समाज प्रबोधनाचे वैशिष्ट्य सांगत बौद्ध पर्वातील संस्काराचे महत्त्व प्राप्त झाले पाहिजे म्हणून त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने येथील महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे प्रारंभी माजी सरपंच
ज्योती अरुण लोखंडे,कोमल माने,सोनल भालेराव,सपना गायकवाड,सुप्रिया लोखंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून त्रिशरण पंचशिल ( बुध्द वंदना) घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने जळकोट प्राथमिक आरोग्य केद्राच्या वैद्यकीय आधिकारी ईश्वरी धायगुडे आरोग्य सेविका सिंधू लोखंडे आशा सेविका रेणुका नळगे शालीनी कडते उपस्थित होते तर या प्रसंगी जळकोट प्राथमिक आरोग्य केद्रात सलग वीस वर्ष रुग्ण सेवा केलेल्या आरोग्य सेविका सौ गोकर्णा ढगे यांचा सेवा निवृती झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेत मुलींनी भिमगितावर नृत्य सादर केले तर
महिलानी रमाई च्या जीवन चरीत्रावर गितांचे सादरीकरण
केले. यावेळी उषा कदम प्रज्ञा लोखंडे अस्मीता लोखंडे वर्षा गायकवाड प्रज्ञा माने राधिका लोखंडे बबीता लोखंड साधना लोखंडे वैजता लोखंडे सुर्वणा लोखंडे मनिषा लोखंडे स्वाती लोखंडे शोभा लोखंडे सुकमार सोनकांबळे रेषा सोनकांबळे सुनिता लोखंडे सुमन लोखंडे अनुसचा साखरे कांचन लोखंडे लता माने आशा लोखंडे लक्ष्मी लोखंडे भिवरा लोखंडे गेंदा भालेराव रोहीणी माने श्यामल सोनकांबळे कस्तुरा लोखंडे शुंभागी लोखंडे शुंभागी सोनकांबळे शितल लोखंडे सुशीला लोखंडे नेहा लोखंडे सपना लोखंडे पृथ्वी बनसोडे स्नेहा माने संस्कृत्ती भालेराव पुजा गायडवाड श्वेता गायकवाड अर्पिता लोखंडे सुमती लोखंडे सह मंडळाच्या महीला मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी बुध्द पुजा पाठ पुस्तकांचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्र संचलन आभार आशा सेविका मनिषा गायकवाड यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत