साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचा उपचारांदरम्यान मृत्यू.
पुणे : सन २०१२ मध्ये जंगली महाराज रोड पुणे येथे घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज उर्फ हमजा अब्दुल सय्यद याचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अटकेची कारवाई झाल्यापासून फिरोज हा ऑर्थर रोड कारागृहात होता. तेथूनच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मृतदेह रविवारी रात्री कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत