डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करावी
नळदुर्ग येथे भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा बैठकीत झाला निर्णय
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आसुन प्रत्येक गावात समाज एकत्र करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करावी बौद्ध संस्कारांचे महत्त्व सांगत मात्र संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मात्र संस्थेचे बॅनर लावुन प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत या विचारांची देवाणघेवाण प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी आसेल प्रत्येकाने बाबासाहेब वाचला पाहिजे जे वाचेल तोच वाचेल आसे परखड मत भारतीय बौद्ध महासभेच्या दक्षिण विभाग जिल्हाध्यक्षा विजयमालाताई धावारे यांनी केले.
नळदुर्ग येथे उद्योगपती चंद्रकांत डावरे यांच्या स्वगृही दक्षिण जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस अध्यक्षीय समारोप करताना बोलत होत्या
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्रिशरण पंचशिल घेऊन बैठकीला सुरवात करण्यात आली
तर प्रमुख उपस्थिती केंद्रीय शिक्षक माजी श्रामणेर तथा बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे , जिल्हा कोषाध्यक्षा राजश्रीताई कदम , जिल्हा पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे , जिल्हा संघटक विजय बनसोडे जिल्हा कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे जिल्हा महिला उपाध्यक्षा शिलाताई चंदनशिवे केंद्रीय शिक्षीका मिनाताई लगाडे उमरगा तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे तुळजापूर तालुका अध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे तालुका सरचिटणीस उमेश गायकवाड अविनाश भालेराव , किरण कांबळे , उद्धव गायकवाड , विद्याताई कांबळे , झुंबर गायकवाड , संगीता गायकवाड सिमा लोंढे , संगीता भोसले , इंदुबाई भालेराव बलभीम गायकवाड आदिजनांच्या उपस्थितीत ही दक्षिण जिल्हा बैठक संपन्न झाली यामध्ये समता सैनिक दल बौद्ध धम्म परिषद मागील अहवाल वाचन करून पुढील कार्यवाही साठी सुरवात करण्यात आली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत