मराठवाड्यात केवळ तीन महिन्यांत २१३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन- वर्षभरात 1088 आत्महत्या.

छत्रपती संभाजीनगर : राज्य व केंद्र शासनाने वारंवार विविध उपाययोजना करून ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत. शासनाच्या या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, वशिलेबाजी व नकली लाभार्थी असल्याने खऱ्या गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याची शक्यता आहे.
गेल्या तीन महिन्यांत मराठवाड्यातील २१३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात सर्वाधिक म्हणजे ४५ घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत.
गेल्या वर्षभरात मराठवाड्यातील तब्बल १०८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या वर्षात अवघ्या महिनाभरातच ८२ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली. यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल २१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात जानेवारी महिन्यात ८४, फेब्रुवारीत ६२ तर मार्च महिन्यात ६७ घटना घडल्याचे समोर आले.
गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक म्हणजे ४५ आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात ३७ दुर्देवी घटना घडल्या, अशी माहित विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत