शिक्षकांना मोठा धक्का ‘यू-डायस’ मध्ये माहिती न भरल्यास वेतन रोखणार त्यावर काय म्हणाली शिक्षक संघटना?

आधी अशैक्षणिक कामे बंद करा: शिक्षक संघटना
शिक्षकांवर लादलेले आधी १५१ प्रकारचे अशैक्षणिक काम काढून टाकले पाहिजे. शिक्षक आपल्यापरीने राज्यामध्ये माहिती भरत आहेत. परंतु, हजारो शाळांमध्ये विजेची सोय नाही, संगणक इंटरनेट याची सोय नाही, ही अडचण शासन समजून घेणार का? शासन शिक्षकांचा पगार कापू शकत नाही, त्यांना तसा अधिकार नाही, शिक्षक हे काही वेठबिगार नाहीत, अशा प्रतिक्रियाही शिक्षक संघटनांनी व्यक्त केल्या.
शालेय शिक्षण विभागाने शाळा, विद्यार्थी, शिक्षक आदींसंदर्भात वेळोवेळी यू-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर आता त्यांचे वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. यासाठी गुरुवारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी आदेश जारी केले.
शिक्षकांनी या आदेशाला जोरदार विरोध करत शिक्षकांचा सन्मान राखा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या यू-डायस या वेब पोर्टलमध्ये प्रत्येक शाळेची माहिती
दरवर्षी भरली जाते व अपडेट केली जाते. राज्यातील सर्व शाळांची माहिती ३१ ऑक्टोबरपर्यंत भरण्याचे कळविण्यात आले होते. परंतु, २२पर्यंतच्या आकडेवारीनुसार, ८८.०८ टक्के शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे.
७६.२७ टक्के शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम आहे. ७१.७० टक्के विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५ हजार ७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहिती भरण्यास सुरुवात केली नाही; तर १२ हजार ९४७ शाळा भौतिक माहिती भरण्यासाठी चालढकल करीत आहेत. त्यामुळे माहिती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत