शिंदे गटाच्या खासदारांची तिकिटं कापल्यामुळे आमदारांच्या चिंतेत वाढ – विजय वडेट्टीवार

मुंबई : लोकसभा 2024 मध्ये जवळ जवळ सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी, युती साठी सेटिंग चालू असलेली पाहायला मिळत आहे. यात बऱ्याच विद्यमान खासदारांना घरी बसावे लागत आहे तर कांहीं नवीन चेहरे खासदारकी साठी रिंगणात दिसत आहे.
शिवसेना शिंदे पक्षाच्या 13 पैकी जवळपास 5 खासदारांचा पत्ता कट झालाय. त्यामुळे शिंदे पक्षाच्या 40 आमदारांची धाकधूक वाढलीय. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय होणार? हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले, मुख्यमंत्री बनले. शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा जे 13 खासदार शिंदेंसोबत होते त्यापैकी तिघांची तिकिटं कापली गेलीत. आणखी दोघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्व्हेत शिंदेंच्या काही खासदारांबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं गेलं आणि शिंदेंना उमेदवार बदलावे लागले..
खासदारांची तिकिटं कापल्यामुळे आमदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जे अनेक टर्म निवडून आलेल्या खासदारांसोबत घडू शकतं तेच आमदारांसोबत घडायला वेळ लागणार नाही, अशी भावना शिंदे पक्षातल्या आमदारांमध्ये वाढू लागल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेना शिंदे पक्षाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत असा दावा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत