मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; भाजपा सोबतची जवळीक भोवली

शिरूर : लोकसभा 2024 च्या रणधुमाळी मध्ये समाजात चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी ने मोठा निर्णय घेतला आह. गोपीनाथ पडळकर प्रकरण सोसलेल्या वंचित ने यावेळी मात्र वेळेत सावध होत कठोर कारवाई केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
परंतु मंगलदास बांदल हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधी उमेदवारांची भेट घेतल्याचे लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमध्ये दशरथ मानेंच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे शिरुर मतदार संघातील उमेदवार मंगलदास बांदल हेदेखील उपस्थित होते. तसे फोटोदेखील सोशल मीडियात व्हायरल होत होते. भाजप हा एक नंबरचा विरोधक असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीकडून वारंवार मांडण्यात येते. अशावेळी मंगलदास आणि फडणवीसांचे एकत्र फोटो पाहून वंचितवर मोठी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर वंचितने मोठा निर्णय घेतला आणि मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार उमेदवारी रद्द करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत