54 वर्षानंतर दिसणार दुर्मिळ सूर्य ग्रहण; खगोलप्रेमिंसाठी पर्वणी
वर्ष 2024 हे खगोलीय घटना साठी खास आहे. तब्बल 54 वर्षानंतर हा दुर्मिळ योग येत आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे गुढीपाडव्यापूर्वी फाल्गुन अमावस्येला असणार आहे. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असून त्याला खगोल शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. या वर्षांतील पहिलं सूर्य ग्रहण हे येत्या सोमवारी 8 एप्रिल 2024 ला असणार आहे. यादिवशी सोमवती अमावस्या आहे.
हे खग्रास सूर्यग्रहण असून 1973 नंतर पहिल्यांदाच ग्रहणामुळे 7.5 मिनिटं सूर्य दिसणार नाही. वैज्ञानिकांनुसार यादिवशी पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे अंधारमय होतो. यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात.
8 एप्रिल रोजी रात्री 09:12 ते 09 एप्रिल रोजी पहाटे 02:22 पर्यंत सूर्य ग्रहण होईल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तब्बल ५४ वर्षांनंतर अनेक दुर्मिळ योगायोग घडणार आहेत. असे सूर्यग्रहण 1970 मध्ये झाले होते. याशिवाय सूर्यग्रहणाच्या वेळी धूम केतू आणि शुक्र आणि गुरु ग्रहही प्रत्यक्ष पाहता येतात. ही खगोलप्रेमिंसाठी एक पर्वणीच आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत