बड्या नेत्यांच्या निवडणूक खर्च हिशोबात तफावत; हिशोब न दिलेल्यांना 48 तासात स्पष्टीकरण देण्याची निवडणूक आयोगाची नोटीस.
नागपूर : निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाला घटनात्मक विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत.
लोकसभा निवडणूककाळात पैशाचा वापर प्रमाणानुसार व्हावा यावर आयोग नियंत्रण ठेवते. विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केलेली असते.. आयोगाची या खर्चावर नजर असते. शुक्रवारी नागपूर आणि रामटेक मतदारसंघांतील उमेदवारांच्या खर्चाचा हिशेब तपासण्यात आला. यानुसार नागपुरातून भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या खर्चात तफावत आढळल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. रामटेकमधून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्याही खर्चात तफावत आढळली आहे.
प्रत्येक उमेदवाराला 95 लाख पर्यंत खर्च करता येतो, खर्चाचा आकडा वाढल्यास निवडणूक आयोग आक्षेप घेऊन कारणे दाखवा नोटीस देऊ शकते. असाच प्रकार नागपूर मध्ये घडलाय.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झालेल्या खर्च तपासणीत ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या खर्चात १३ लाख ६३ हजार रुपयांची, विकास ठाकरे यांच्या खर्चात ८ लाख ९२ हजार रुपयांची तर श्यामकुमार बर्वे (रामटेक) यांच्या खर्चात २ लाख ९६ हजार रुपयांची तफावत आढळून आली आहे. आयोगाने याची दखल घेत सूचना केल्या आहेत.
ज्या उमेदवारांनी तपासणी वेळी हजेरी लावली नाही किंवा हिशोब सादर केला नाही अशा उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवून ४८ तासांच्या आत खर्च सादर करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत