देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणशैक्षणिक

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळणार दुहेरी पदवी ; अमेरिकेतील विद्यापीठाशी करार.

मुंबई : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे आणि विद्यापीठातून दुहेरी पदवीचे शिक्षण देण्यासाठी योजना आखली आहे.

मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या शैक्षणिक वर्षापासून माहिती तंत्रज्ञान विभागात एम.एस. इन डेटा एनालॅटिक्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात मिळणार आहे. तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. 

मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतल्या प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये आता विद्यार्थ्यांना दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. एम एस सी इन डेटा सायन्स (MSc in Data Science) या पदवीच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर उर्वरित दोन सत्राचे शिक्षण हे अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालनही खुले होणार आहे.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे दुहेरी पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या दुहेरी पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे. आज मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात युएएस वाणिज्य दुतावास या ठिकाणी या करारावर सह्या करण्यात आल्या. 

विद्यार्थ्यांस दुहेरी पदवी चे फायदे.
· मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून मिळणाऱ्या दुहेरी पदवीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढविण्यास मदत
· विद्यार्थ्यांना भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा फायदा
· दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणे आणि अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जागरूकता, अनुकूलता आणि भाषा कौशल्ये विकसित करण्यास मदत
· सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत
· दोन्ही संस्थांमधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि प्रयोगशाळांच्या प्रवेशामुळे व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढीस चालना

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!