माढ्याचे संजय कोकाटे यांचा शिंदे गटाला जय महाराष्ट्र ! राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश.
माढा : लोकसभा 2024 च्या अनुषंगाने नेते मंडळी च्या इकडून तिकडे उड्या सुरूच आहेत. उमेदवारीच्या आशेने, नाराजीने किंवा मग तपास यंत्रणांच्या भीतीने, कारण कांहीं का असेना पण बेडूक उड्या मात्र चालू आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघाचे संजय कोकाटे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे संपर्कप्रमुख होत. परंतु महायुतीत माढ्याची जागा भाजपा ला गेली आणि रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कोकाटे नाराज असल्याची चर्चा होती.
नाराजीने आणि उमेदवारी मिळण्याचा आशेने शुक्रवारी संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला.. कोकाटे यांना माढ्यामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत