अखेर श्रीकांत शिंदेंचे “कल्याण !” -महायुती कडून उमेदवारी जाहीर
भाजपा कार्यकर्ते आक्रमक; प्रचार न करण्याचा पावित्रा
मुंबई : लोकसभा 2024 च्या मुंबई च्या जागेचा तिढा सुटताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अखेर कल्याण चां महायुतीचा उमेदवार जाहीर केला आहे.
विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येत आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे गटाची दुसरी यादी जाहीर होण्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीतून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा खासदारपदी निवडून आले आहेत. यंदा त्यांना विजयाच्या हॅटट्रिकची संधी आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उमेदवार आहेत.
दरम्यान श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिल्यास प्रचारात उतरणार नाही अशी भूमिका कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीनंतर भाजप पदाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत