वसंत मोरे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश.
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा 2024 चे पुणे मतदार संघातुन उमेदवार असलेले आयु. वसंत मोरे यांनी अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत रीतसर पक्ष प्रवेश केला आहे.
राज ठाकरे यांच्या मनसेतून बाहरे पडलेल्या वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील निवासस्थानी वसंत मोरे यांचा पक्ष प्रवेश झाला. वसंत मोरे यांनी पुण्यातून विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी उभी करण्याचा खंबीर निश्चय केलेला आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडत वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत तब्बल 25 उमेदवार मैदानात उतरवलेत. अकोल्यामधून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना भक्कम साथ देण्यासाठी वसंत मोरे हे बाळासाहेबांच्या पाठीशी मोठ्या विश्वासाने उभे आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत