काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल – संजय निरुपम यांचे भाकीत
मुंबई : काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनातली गोष्ट व्यक्त करताना संजय निरुपम यांनी आपली हकालपट्टी नाही, तर स्वतःहून राजीनामा दिल्याचं सांगितलं.
माजी खासदार असलेले संजय निरुपम हे बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. त्यात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंनी लोकसभेची उमेदवारी अमोल कीर्तिकर यांच्या गळ्यात टाकली. त्यानंतर निरुपमांची नाराजी प्रकर्षाने पुढे आली. काल पत्रकार परिषद घेऊन गांधी घराण्यावर थेट निशाणा साधत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. ‘काँग्रेस सिर्फ इतिहास में रह जायेगी’ असं म्हणत त्यांनी त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून दिली.
दरम्यान आज त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या ‘मन की बात’ जाहीर केली. “काँग्रेसमधून मुक्ती मिळाल्याने आज मन खूप हलकं झालं आहे, छातीवरचं ओझं उतरलं, असं वाटतंय. संपूर्ण काँग्रेस कुटुंबाचे आभार” असं लिहिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत