प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

रविवार २१ एप्रिल रोजी सोलापुरात होणार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक – राजाभाऊ सरवदे

उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे यांची निवड

सोलापूर : यंदाच्या वर्षी मध्यवर्ती उत्सव विश्वस्त समितीत ४२५ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळे सहभागी होणार असून १५० मिरवणूक निघतील अशी माहिती अध्यक्ष नागेश रणखांबे यांनी दिली.

सालाबाद प्रमाणे ३१ मार्च शुक्रवार रोजी एम्प्लॉयमेंट चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती यांची २०२४ ची वार्षिक नियोजन बैठक मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडली.

सदर बैठकीची सुरुवात भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली,

२०२४ वार्षिक बैठक मावळते उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीत २०२३ चा जमा खर्च सादर करण्यात आला, त्याचं प्रमाणे २०२४ भिम जयंती उत्सवाचा सप्ताह ठरवून,यंदाची जयंती ही सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यक्रम करून साजरा करावी असे मध्यवर्ती च्या वतीने आदेश देण्यात आले.
सर्व मंडळांच्या मागे विश्वस्त समिती ही आज पर्यंत जशी खंबीरपणे उभी आहे तशीच येणाऱ्या काळात आपल्या सोबत असेल असे अश्वस्त केले.

यंदाच्या वर्षी अध्यक्ष पदी नागेश रणखांबे यांची तर कार्याध्यक्ष पदी व्यंकटेश भंडारे
तसेच सचिव संघमित्रा चौधरी
कोषाध्यक्ष म्हणून अमोल धेंडे तर
ऑडिटर पदी अनिल सोनकांबळे यांची
सर्वांनू मते निवड करण्यात आली व सत्कार करण्यात आला.

सदर बैठकी मध्ये सामाजिक संस्था,मंडळे,कार्यकर्त्यांच्या वतीने मध्यवर्ती समितीस स्वखुशीने सभासद वर्गणी जमा करण्यात आली.

या बैठकीस राजाभाऊ सरवदे, सुभानजी बनसोडे, राजाभाऊ इंगळे, राहुल सरवदे, प्रवीण निकाळजे, संजीव सदाफुले, अतुल नागटिळक, उत्तमप्रकाश खंदारे, राजा दावणे, राजा कदम, शशी कांबळे, रवी गायकवाड, अजित गायकवाड, अरुण भालेराव, राजेश उबाळे, श्रीशैल गायकवाड, विजय पोटफोडे, भारत वडवेराव, राजा सोनकांबळे, विश्वास तळभंडारे, बबलू गायकवाड, राहुल शंके, सुशील सरवदे, उमेश सुरते, सूरज निकंबे, विजय सोनवणे, शशी तळमोहिते, मदन वडावराव, पिंटू ढावरे, यशपाल सोनकांबळे, बापु सदाफुले, युवराज पवार, खंडू साबळे, महेश गजधाने, दावला सुर्वे, अतिश शिरसठ, गौतम कसबे, जयप्रकाश भंडारे, अनिल आठवले, सचिन कांबळे, निलेश भंडारे, मधुकर आठवले, बापु शिवशरण, महादेव कांबळे, दिपक शिंदे, महादेव बाबरे, श्याम धुरी, धर्मेंद्र चंदनशिवे, चंद्रसेन जाधव, सुमित शिवशरण, विक्रांत गायकवाड, अनिल सरवदे, बंटी गायकवाड, विशाल कांबळे, सचिन शिंदे आदी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, मंडळातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!