ब्रह्मामणाने कोणतेही रूप धारण केले तरी तो ब्रह्मामणच राहतो.
प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
सामान्यपणे कोणत्याही महापुरुषांच्या अनुयायाने त्यांच्या एखाद्या निर्णयाची कॉपी करू नये कारण आपण एक तर सामान्य अनुयायी असतो आणि ते महापुरुष असतात आणि त्यामुळे आपली चांगलीच फजिती होऊन जाते. आज काल अनेक तरुण मग ते कोणत्याही समाजाचे असोत ते काही प्रमाणात नक्कल करण्याचा प्रयत्न करतात आणि काही वयाने मोठे व्यक्ती सुद्धा असा प्रयत्न करतात. त्यांना पाहून तर हसू येते. कारण एक वेळ आपण तरुणांचे काही प्रमाणात समजू शकतो की, त्यांना वयानुसार एवढी समज नसते, आणि अनुभव कमी असतो , वाचन कमी असते पण या प्रौढ लोकांचे काय ? यांना समज कधी येणार ? म्हणजे घरात दोन –चार पुस्तके नसतील आणि त्यातील एखादे वाचले असेल आणि एखादे पान समजले असेल पण इकडे व्यवहारात कोट,टाय आणि सूट घालून साहेब तर बाबासाहेब झाल्यासारखे समजतात. बाबासाहेब यांचे अनुयायी यांनी चांगले कपडे घातले पाहिजे या मताचा मी आहे पण इतर बाबीचे काय ? अभ्यासाचे काय ? प्रामाणिक काम करण्याचे काय ? हे आणि असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कपडे घालणे , त्यांच्यासारखा चश्मा घालणे या भौतिक बाबी आहेत त्या बाजारात मिळतात. पण त्यांचे कष्ट आणि तत्वपालन याला जगात तोड नाही. त्याचे काय ? आणि कोणतेही महापुरुष हे जगात एकच असतात आणि म्हणून आंबेडकर अनुयायी एक नारा देतात की, एकच साहेब , बाबासाहेब आणि अगदी योग्य आहे कारण भारतात कितीही साहेब झाले तरी, बाबासाहेब एक एकच महापुरुष आहेत की, त्यांना साहेब म्हणावे असे आहेत आणि त्यात पुन्हा माता रमाईने साहेब म्हणावे म्हणजे त्यांच्या तोंडून साहेब म्हणणे हे तर फार विशेष आणि एकमेवाद्वितीय आहे. आणि त्यामुळे मी मागे एका लेखात लिहले होते की, दाढी वाढवून कोणी छ्त्रपती शिवाजी महाराज होत नाही, मिशा वाढवून कोणी छ्त्रपती शाहू महराज होत नाही आणि कोट घालून कोणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत नाही. ही सर्व बाह्य अनुकरणे आहेत. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे काल म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात एक बातमी वाचली आणि ती बातमी होती नाशिक येथील श्वास फाउंडेशन आयोजित “ भारत @२०४७” व्याख्यानात जेष्ठ विचारवंत (?) डॉ. उदय निरगुडकर यांचे एक स्टेटमेंट होते की, “ भारत बनतोय जगाचे केंद्रस्थान.” या शीर्षकाचे आणि याचे विश्लेषण तर फार मजेशीर आहे त्यात ते पुढे म्हणतात की, “ स्वातंत्र्यापूर्वी परकीय आक्रमकांनी भारतासारख्या संपन्न व सामर्थ्यशाली राष्ट्राची लयलूट केली. स्वातंत्र्यानंतर देशात प्रगतीची पहाट अपेक्षित होती. मात्र सत्ताकेंद्री राजकारण आणि स्वार्थी धोरणामुळे देश विकसनशील राष्ट्रच राहिला. तो ७५ वर्षाच्या मोठया कालखंडात विकसित म्हणून पुढे येऊ शकला नाही. मात्र, सन २०१४ पासून भारताची प्रतिमा वेगाने कात टाकते आहे. जगाच्या पाठीवर गृहीत न धरले जाणारे प्रचंड सामर्थ्यशाली राष्ट्र जगाचे केंद्रस्थान बनत आहे.” पुढे ते असेही म्हणतात की, “ करोनाच्या महासंकटात विकसित देशाच्याही श्रीमुखात चपराक मारावी इतकी उज्ज्वल व अभिमानास्पद कामगिरी भारताने केली आहे. जे रशियालाही जमले नाही पण हे विसरले वाटतय की, गंगा नदीत प्रेते फेकून द्यावी लागली आणि उत्तर प्रदेशातील एका कवयत्रीने यावर केलेली कविता किती मोठया प्रमाणात व्हायरल झाली होती. आणि इकडे जनता कोरोंनामुळे हैराण असतांना हे महाशय शेतकरी विरोधी कायदे पास करून घेत होते आणि आता मणीपुर प्रकरण तर जगात पोहोचले आणि आपली मान शममेने खाली गेली आणि यांचा नारा आपल्याला माहीत आहे बेटी पढाव , बेटी बचाव आहे याला प्रगती म्हणत असतील तर हसावे की,रडावे ? हा प्रश्न आहे आणि आपली पत्रकारिता कुठे चालली आहे याचे आपल्याला विशेष वाटत आहे. ते चांद्रयान चंद्रावर पाठवून भारताने यशाची नवी दिशा आहे. या घटना २०४७ मध्ये भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची चिन्हे असल्याचे ते म्हणाले , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अर्थतज्ञ (?) डॉ. विनायक गोविलकर होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार , सचिव मकरंद वाघ मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. पण या ठिकाणी जे शास्त्रज्ञ जीव ओतून काम करीत होते त्यांना कित्येक दिवसापासून पगार नाही हे तर भयानक आहे. म्हणजे शिक्षक विंनाअनुदान काम करतात किंवा कंत्राटी काम करतात हे ऐकले होते पण शास्त्रज्ञ सुद्धा अशा अवस्थेत आहेत हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले.
म्हणजे ही बातमी वाचून मला ती एक फडतुस अभिनेत्री कंगणा रणावत ही जे बोलली की, “ भारत को आझादी २०१४ को मिली.” आणि ते तिचे स्टेटमेंट वाचतांना फार वाईट नाही वाटले पण हे महोदय जेष्ठ पत्रकार आहेत. मी विचारवंत मानत नव्हतो आणि मानत नाही पण निदान जेष्ठ आहेत एवढी वर्ष पत्रकारितेत खर्च केली तर निदान त्या अनुभवाने तर आपण सत्य बोलले पाहिजे. आणि सत्य मांडले पाहिजे, ही पत्रकारितेतील एक महत्वाची अट असावी. आणि तेच काम अनेक पत्रकार करीत नाहीत आणि त्यामुळे त्यांना २०१४ पासून अनेक नांवे दिली गेली आहेत. आज पत्रकारिता इतक्या खालच्या स्तराला गेली म्हणजे काही स्तरच राहिला नाही. असे पक्षपाती आणि समाजला दिशाभूल करणारे पत्रकार कारणीभूत आहेत. कधीतरी मागे झी -२४ तास अशा चॅनेलवर मी यांना मुलाखत घेताना पाहिले होते. आणि चांगले करंट विषय असत आणि त्यामुळे मी कधीतरी अशा मुलाखती ऐकताना आणि पाहतांना मला वाटत होते की, एक चांगला अभ्यासू पत्रकार आहे म्हणजे पुरोगामी नाही पण अभ्यासू आहे पण आज तो भ्रम सुद्धा दूर झाला. आणि काय लोक असतात. मग मला इतर अनेक लोक म्हणजे ब्रह्मामण आहेत आणि ते पत्रकार क्षेत्रात काम करतात त्यांच्यावर शंका येऊ लागली आणि तसा माझा स्वभाव सुद्धा चिकित्सक आहे. आणि तथागतांचा एक अनुयायी असल्यामुळे चिकित्सा तर होणारच आहे. आणि ही बातमी वाचून मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब्रह्मदेशातील १९५४ मध्ये बुद्धिष्ट शासन कौन्सिल यांचे समोर जे भाषण झाले त्यातील या विषयासंदर्भात जो भाग आहे त्याची आठवण झाली आणि डॉ. बाबासाहेबांना दुरदृष्टा म्हणणे किती योग्य आहे याची मला प्रचिती आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या भाषणात म्हणतात की, “ बौद्ध धम्माला इस्लाम धर्मापासून आता भय उरलले नाही. परंतु ब्रह्मामणापासून अजुनही भय आहे. बौद्ध धम्माला ब्रह्मामणत्व सर्वात मोठा शत्रू आहे. ब्रह्मामण हा कोणत्याही पक्षात गेला असला अगर कोणतेही रूप धारण केले तरी तो ब्रह्मामणच राहतो.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक ब्रह्मामण लोक कार्यकर्ते होते मग आपण सुद्धा ब्रह्मामण लोकांसोबत काम करायला काय हरकत आहे, असे आज अनेकांना वाटते आणि त्यामुळे असे लंगडे समर्थन करीत लोक खरं म्हणजे स्वत:चा स्वार्थ साधतात. आणि आता इतक्या वर्षात हे समाजाच्याही लक्षात आले आहे. पण लोक आता सर्वच नेते अशी भूमिका घेत असल्यामुळे गोंधळात पडले आहेत. म्हणजे आपल्या आंबेडकरी नेत्याची दोनपैकी एक तरी विशेष आहे एक तर यांच्यासोबत ब्रह्ममण लोक आहेत म्हणजे यांच्या डोक्यावर बसलेले यांचे मार्गदर्शक आहेत किंवा यांची पत्नी ब्रह्मामणाची आहे. यांना पत्नी ब्रह्मामण करण्याचे काय मोठेपण आहे मला आजपर्यंत समजले नाही. यांना वाटते आम्ही फार मोठा तीर मारला आहे. पण यांना माहीत नाही त्यांनी (ब्रह्मामण) यांची शिकार केली आहे. आणि आपले वाघ मग रिंगमाष्टरच्या इशार्यावर काम करीत आहेत. आणि जर आज कोणी असा कार्यकर्ता असेल की, ज्याने यापैकी काहीच केले नाही तर मग त्याने नविन पार्टी तयार करून आपल्या आंबेडकरी पक्षाला एक मोठे खिंडार पाडले आहे. आणि त्यामुळे अशी अनेक खिंडारे पाडणारे कार्यकर्ते सुद्धा डॉ. बाबासाहेबांचा चळवळीला मारक आहेत. आता समाजाने विचार करा की, असे किती लोक आहेत जे आपल्या समाजाचे नुकसान करीत आहेत. आणि या ब्रह्मामण लोकांची अशी घातक विचारसरणी असल्यामुळे आता प्रत्येक ब्रह्मामण विचारवंत यावर तो कितीही पुरोगामीत्वाच्या गप्पा मारीत असला तरी संशय येतो. कारण शेवटी आपल्या आदर्शाने म्हणजे खुद्द डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला सावध राहावयास सांगितले आहे हे आपणास विसरता येणार नाही. असे पुरोगामी ब्रह्मामण आपल्यात संघटना फोडण्यासाठी येतात किंवा आपले नेतृत्व करण्यासाठी येतात आणि या दोनीही भूमिका आपल्याला नुकसानकारक आहेत. म्हणजे हे अनेक संघटना पक्ष आणि मीडिया यात काम करतात पण त्यांना शेवटी आर.एस.एस. चा अजेंडा राबवायचा आहे हे मात्र आपण कधीच विसरू नये . आणि जेंव्हा जेंव्हा अशा नाशिक सारख्या कार्यक्रमाचे आयोजन होते आणि त्यांना ते आयोजक लोक बोलावतात तेंव्हा ते त्यांची मूळ भूमिका स्पष्ट मांडतात आणि आपले लोक चार लोकात आपल्याला जयभीम करायला लाजतात. फक्त मान खाली करतात किंवा काही तर मी नमस्कार करतांना पाहिले आहेत. कारण यांना आपल्या उपकार कर्त्याची जाणीव नाही असेच म्हणावे लागेल.
आज तर मला वाटते केवळ आंबेडकरीच नाही तर संपूर्ण बहुजन समाजाने या ब्रह्मामणी विचार आणि षडयंत्रा पासून सावध राहावे. कारण आपल्या सर्वच महापुरुषांना यांनीच धोका केला आहे. पण आता आपल्या बहुजन समाजाचे वाचन नाही त्यामुळे त्यांना कोणी काय धोका केला आहे आणि आपले महापुरुष कसे संपविले आहेत हे माहीत नाही. आणि काहींना माहीत झाले तरी ते यांना त्यांच्या घरी अनेक धार्मिक विधिना बोलावतात आणि देणग्या देतात पण यांना माहीत नाही की, ब्रह्मामण लोकांनी त्यांची भूमिका आजही सोडली नाही आणि त्यांचे कर्तव्य सुद्धा सोडले नाही. म्हणजे त्यांचे पूर्वज जे काम करीत होते तेच आज करतात सर्व बहुजन समाजाला अनेक कर्मकांड आणि विधी यातून आर्थिक आणि मानसिक शोषण करतात उलट त्याचे स्वरूप जास्त भयानक झाले आहे. म्हणजे यांनी आता नविन नविन विधी सुरू केले आणि सतत बहुजन समाज भितीयुक्त वातावरणात राहिला पाहिजे याची दक्षता घेतात. आणि हेच यांचे सर्वात मोठे भांडवल आहे. जेंव्हा बहुजन समाज यांच्या भीतीपासून दूर जाईल आणि सर्व कर्मकांड बंद करेल तेंव्हा यांचे अस्तित्व संपले समजा पण आपल्या समाजात भित्रे लोक खूप आहेत आणि यापासून दूर जाण्याची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला केली. पण इतर बहुजन समाज कधी करणार आहे ? आणि 12 जानेवारी 2005 ला सिंदखेड राजा येथे मा. आ.ह. साळुंखे आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी सुद्धा शिवधर्म स्थापन करून केली पण सामान्य जनतेने त्यांना म्हणावा तसा सपोर्ट केला नाही. आज सुद्धा बहुजन लोक या विषारी ब्रह्मामण समाजाच्या तावडीतून सुटलेले नाहीत. आणि यांनी संपूर्ण समाज गुलाम करण्याचा प्रयत्न केला आणि बुद्धकाळापासून ही परंपरा आहे सम्राट अशोक यांच्या काळात सुद्धा 60 हजार खिक्खुंना संघाबाहेर का हाकलले होते ? याचे हेच कारण होते की, यांची आत घुसून समाज नष्ट करण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे आपण सावध असले पाहिजे. आज आपला समाज मोठया प्रमाणात शिक्षण घेत आहे. पण सावध होत नाही आणि मानसिक सशक्त होत नाही. म्हणजे आमचा कलेक्टर जरी झाला तर तो म्हणणार ब्रह्मामण नाही तर मग आमचा कार्यक्रम कसा होणार ? म्हणजे एवढा अभ्यास केला पण दृष्टी आली नाही. आमचे विज्ञानाचे प्राध्यापक म्हणतात आज मला एकादशी आहे. आज सोमवार उपवास आहे. आणि अनेक नवस सायास करतात. आता मी 2023 यावर्षी विद्यापीठाच्या एका परीक्षेच्या स्क्वॉडच्या कामात असतांना बरेच कॉलेज फिरावे लागते तर एका ठिकाणी एक देवस्थान आले अंतापूर आणि आमचे चेअरमन असणार्या प्राध्यापकाने गाडी मंदिरासमोर थांबवली आणि सांगितले की, “ चला आले आहोत तर दर्शन घेऊ.” मग सर्व खाली उतरले त्यात पाच लोक होते एक महिला होती म्हणजे महिला प्राध्यापक मुलींना चेक करण्यासाठी असतेच सर्व मंदिरात निघाले. आणि यात माझ्या माहिती प्रमाणे दोन प्राध्यापक आंबेडकरी अनुयायी होते म्हणजे मी एक आणि दुसरे एक सायन्सचे प्राध्यापक होते. मंदिरात प्रवेश केला आणि मी निरीक्षण करीत होतो. तेवढयात त्या सायन्सच्या प्राध्यापकाने नम्र आणि भक्तिभावाने दोन्ही हात जोडले त्या बाबाला, आणि मला थोडा धक्काच बसला थोडा यासाठी की, मी या 20 वर्षात नाशिक जिल्ह्यात असे अनेक प्राध्यापक पाहिले आहेत. पण आता हे मूळचे नाशिकचे नव्हते आणि त्यामुळे अपेक्षा होती की, असे काही होणार नाही पण झाले. म्हणजे सांगायचे तात्पर्य हे की, विज्ञान विषयात उच्च शिक्षण , पी,एचडी प्राप्त आणि पुन्हा कहर म्हणजे बौद्ध धम्माचा उपासक आहे. आता काय म्हणावे या माणसाला ? माझ्या मनात थोडी आत्मियता होती ती सुद्धा कमी झाली अर्थात हा विषय मी एखाद्या वेळी बोलणारच आहे. पण आज त्यांची माझी ही पहिलीच भेट आहे त्यामुळे कांही काळ थांबलेले बरे आहे .
आपल्या बौद्ध अनुयायी असतील किंवा बहुजन असतील आपण आज खूप सावध राहावे लागेल. कारण यांचे म्हणजे आर.एस.एस. चे काम आपल्या 100 पट्टीत चालू आहे. आणि आपण आपले बेफिकीर आहोत. हे पुढे चालणार नाही. म्हणजे आंबेडकरी अनुयायी जर असे 3.50 टक्के असते तर यांनी आपल्याला केंव्हाच गुलाम केले असते. पण हे बघा इतके कमी असून सुद्धा आपल्यावर राज्य करतात. याचे कारण त्यांचे काम समाज विघातक आहे पण ते प्रामाणिकपणे करतात आणि त्यामुळे आज ते वाईट मार्गावर असूनसुद्धा यशस्वी आहेत. याचे कारण ते फार विद्वान आहेत हे नाही तर आपण त्यांना विद्वान मानतो म्हणून हे सर्व चालले आहे. म्हणजे 2014 ला नरेंद्र मोदी यांनी कोणते असे कृतृत्व केले होते की, त्यांचा मोठा विजय झाला आणि पुन्हा 2019 ला पुन्हा त्यापेक्षा मोठा विजय मिळाला तर याचे कारण भारतीय जनतेला वाटले म्हणून झाले. नाही तर भाजपाचे कार्य काय ? तर 2014 नंतर देशाला उलटया दिशेला नेले आहे. म्हणजे महागाई वाढली , रोजगार कमी झाला , सर्व शासनाची संपती विकली,आणि सर्व शासकीय संस्था आणि यंत्रणा नियंत्रणाखाली आहेत. त्यामुळे त्यांना जनतेसाठी स्वतंत्र निर्णय घेता येत नाहीत. परंतु जनता अशी आहे की, आज त्यांना पूर्ण धर्म आणि जातीच्या नशेत ठेवले आहे आणि ही नशा अशी असते की, दारू, गांजा आणि इतर नशा यापुढे कमी आहेत. याची नशा लवकर उतरत नाही. आणि समाज पूर्ण विवेक हरवून बसला आहे. यांना असाच समाज पाहिजे आहे. आज आदिवासी जागृत होत आहे पण आपला बहुजन समाज मागे जात आहे. त्यांना एकदा हिंदू आणि हिंदुत्व म्हटले की, नशा येते आणि हेच एकमेव इंजेक्शन आहे की, ज्याची नशा फार काळ चालते. हे भाजपा आणि आर.एस.एस. ने ओळखले आहे. पण याला जबाबदार आपली जनता आहे.
जनता दोषी आहे त्यांना वाटले म्हणजे लोकांना वाटते की, हे सरकार काहीतरी कार्य करील पण वास्तव उलट आहे. आणि असेच आपल्या डोक्यात 1925 पासून बिंबविले की, आर.एस.एस. आपल्या देशात सामाजिक आणि संस्कृतिक कार्य करणारी सर्वत मोठी संघटना आहे. आणि लोकांना वाटले बरोबर आहे. आणि त्यांना अनेक सेवक मिळत गेले आणि पुढे तर ही संख्या वाढत जाऊन करोडो झाली आणि आज त्यांचा पराभव करणे अवघड झाले आहे. पण आता ही गोष्ट हिन्दी विषयातील शेख चिल्ली सारखी आहे ज्या फांदीवर बसले आहेत तीच फांदी तोडत आहे. म्हणजे शेवटी फांदी तोडणारा पडणार आहे. आणि इथे सुद्धा जे जे स्वत: ला हिंदू आणि हिंदुत्ववादी समजतात आणि ज्यांना वाटते की, हिंदू राष्ट्र झाले पाहिजे त्यांना पुढे मात्र गुलाम व्हावे लागेल. कारण हिंदू राष्ट्रात अनेक बाबी आहेत ज्या या हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे त्यांना माहीत नाहीत ते सध्या भ्रमात आहेत पण जेंव्हा होईल तेंव्हा वेळ गेलेली असेल आणि मग काहीच उपयोग होणार नाही. तेंव्हा वेळीच जागे झाले पाहिजे. कांही ठळक बाबी सांगतो त्या आजच सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. हिंदू राष्ट्र झाल्यावर काय होईल पहा तर सध्याचं शिक्षण बंद करून वेदाचं शिक्षण घ्यावं लागेल , अस्पृश्यता पाळावी लागेल, समुद्र ओलांडणे बंद असल्यामुळे प्रधानमंत्र्याचे परदेश दौरे बंद होतील, क्षत्रीय लोकच पंतप्रधान होतील त्यामुळे सध्याच्या पंतप्रधांनांना राजीनामा द्यावा लागेल, निपुत्रिक आणि सन्याशी लोकांना राज्य चालवण्याचा अधिकार नसल्यामुळे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागेल. आणि सर्वात भयंकर म्हणजे स्वत:च्या जाती प्रमाणे व्यवसाय करावे लागतील. आणि त्यामुळे जे हिंदू राष्ट्राचे समर्थक आहेत त्यांनी याची सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी म्हणजे इतर लोक त्याचे अनुकरण करतील. आता बघा म्हणजे कोणाला याचा अभ्यास नसतो फक्त कोणी घोषणा दिली की, आपल्याला सवय झाली आहे मागे घोषण द्यायची पण सत्य काय आहे जे जाणले पाहिजे. आणि म्हणून ही ब्रह्मामणी षडयंत्र आहे यात बहुजन समाजाने या गोड बोलणार्या लोकांच्या जाळयात अडकू नका. आणि कोणताही ब्रह्मामण विचार मांडत असतांना सावधपणे ऐका आणि तो अगोदर काय बोलत होता आणि आता काय बोलत आहे याची तुलना करा जसे आज मी पाहिले की, हे विचारवंत बर्याच मुलाखतीत असे प्रश्न विचारत की, आपल्याला वाटेल हा पुरोगामी ब्रह्मामण आहे पण त्यांचे स्टेज वर गेले की, बरोबर मुळ विचारावर येतो . आर.एस.एस. ही त्यांची कार्यशाळा आहे आणि त्यानुसार ते प्रत्येक क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा अजेंडा पुढे नेतात. म्हणून आर.एस.एस. च्या गुप्त मिटिंगा ते सर्वांना खुल्या ठेवत नाहीत फक्त इतर समाजाला काहीतरी विचार सांगायचे आणि मग त्यांचा त्यांचे फुकट चे सैनिक म्हणून वापर करायचा ही त्यांची स्ट्रॅटजी असते.
आज असे ब्रह्मामण अनेक क्षेत्रात आहेत पत्रकार आहेत , अधिकारी आहेत , कीर्तनकार आहेत आणि प्रचारक आहेत या सर्व पातळीवर आपण सावध असले पाहिजे. आणि सर्वात कहर म्हणजे बौद्ध धम्मात जर ते भिक्खु म्हणून असतील तर यापेक्षा काय भयानक असेल ? आज भारतात जर या आर.एस.एस. ला सर्वात जास्त धाक असेल तर आंबेडकरी अनुयायी यांचा आहे . आणि जर असे भिक्खु संघात हे ब्रह्मामण घुसले तर मग मात्र जास्त सावध राहावे लागेल. कारण इतर ओबीसी आणि इतर मागास जाती या सावध नाहीत. इतर जाती हिंदू नांवच्या आकर्षणात आहेत आणि त्यांना त्यामुळे मोदी आणि त्यांचा पक्ष जवळचा वाटतो. पण तरीही सध्या शेतकरी खूप मोठया प्रमाणात चिडला आहे आणि त्यामुळे त्यांचा विकास रथ गावा-गावात अडवला जात आहे. आणि तरुण विचारत आहेत की, यात भारत सरकार असे नांव का नाही ? म्हणजे आता तरुण वर्ग जागृत होत आहे हे एक चांगले लक्षण आहे. आणि हे असेच प्रमाण वाढले तर 2024 ला आपण एका चांगल्या बदलाची अपेक्षा ठेवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रह्मामण समाजाबद्दल काय म्हणाले होते याची आठवण आज बौद्ध अनुयायी आणि बहुजन समाजाने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
बाबासाहेब आंबडेकर म्हणाले होते की, “ Brahmin is the poison, which has spoiled Hinduism and India also.” (Writing and speeches. Page no. 49) आता एवढा स्पष्ट आणि गंभीर इशारा आपणास दिला असेल तर मग आपले आंबेडकरी कशाला लग्न करीत असतील ब्रह्मामण मुलीशी आणि आज आपल्या समाजात काय मुली नाहीत का ? सर्व प्रकारच्या मुली आहेत बुद्धिमान , सुंदर आणि चळवळीत काम करणार्या मुली आहेत उलट ब्रह्मामण मुली चळवळीत आहेत असे दाखवतात आणि शेवटी आपल्या मुलाचा घात करतात. म्हणजे आपली चळवळ अशामुळे मागे जात आहे. एकदा लग्न झाले की, मग आपले वाघ दात पडलेले होतात आणि त्यामुळे डरकाळी फोडता येत नाही. त्यांना रिंगमाष्टर च्या इशार्यावर काम करावे लागते. आणि त्यामुळे थोडया अंधश्रद्धाळू असतील तरी आपल्या मुली चालतील त्यांना आपण सुधारू शकतो पण या विषकन्या मात्र नाही पाहिजे. शेवटी असेच म्हणावे वाटते की, “ पुरोगामी ब्रह्मामण आणि प्रतिगामी ब्रह्मामण हे एकाच शरीराच्या दोन भुजा असतात.” आणि त्यामुळे सतत सावध असले पाहिजे मग ते आंबेडकरी अनुयायी असतील किंवा आपलेच बहुजन बांधव असतील.
प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
नाशिक ( मो: 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत