उमेदवारीही जाहीर करू न शकणाऱ्यानी जिंकण्याची भाषा करू नये.- संजय राऊतांचा श्रीकांत शिंदेना “बच्चू” म्हणत टोला.
मुंबई : आपण ज्या मतदार संघात खासदार आहात तिथून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब का ? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांना केला आहे.
महायुतीकडून कल्याणमधील उमेदवारी जाहीर न केल्यानं संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल केलाय…कल्याणमधील उमेदवारी आधी शिंदेंनी जाहीर करावी. शिंदे ठाण्याचे तारणहार समजतात मग उमेदवारी का जाहीर केली नाहीस असा सवाल विचारत शिंदे दहशतीखाली असल्याचं म्हटलंय, तर दिल्ली अभी बहुत दूर है असं म्हणत राऊतांनी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख “बच्चू” असा केलाय.
दरम्यान विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष काही दिवसच टिकेल असा दावा केलाय. विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केलीये.
महायुतीतील 10 जागांचा तिढा कायम आहे. मुंबईतील तीन जागांवर उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, ठाणे, संभाजीनगरच्या जागेवर भाजप शिवसेनेनं दावा केलाय. सातारा, धाराशिवच्या जागेचाही महायुतीत तिढा कायम आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत