मतदारांनी कसा निवडावा पक्ष ??
वर वधू प्रमाणे शोध करा,निवड करा :
1.भारतीय संविधानाला आदर्श मानून त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारा पक्ष कोणता?
2.भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची प्रतिष्ठापना करणारा पक्ष कोणता?
3.भारतीय संविधान हाच आमचा जाहीरनामा म्हणणारा पक्ष कोणता?
4.आपल्या राजवटीत एकही जाती व धार्मिक दंगली न होवू देणारा पक्ष कोणता?
5.आपल्या शासनकाळात नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्राथमिक गरजांची पूर्तता करणारा पक्ष कोणता?
6.फुले शाहू आंबेडकरी चळवळ नव्याने उभी करणारा पक्ष कोणता?
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, त्यांची निशाणी, चिन्ह व ध्वज स्वीकारणारा पक्ष कोणता?
8.ओबीसी,एससी, एसटी समाजाचा प्रशासनातील बॅकलॉग भरणारा पक्ष कोणता?
9.प्रमोशनमध्ये आरक्षण देणारा पक्ष कोणता?
10.खाजगीकरणात आरक्षण देणारा पक्ष कोणता?11. महापुरुषांचा सन्मान व आदर करणारा पक्ष कोणता?
12 . सम्राट अशोकाप्रमाणे समृद्ध
व विकसित भारत निर्माण करू शकणारा पक्ष कोणता?
असे विविध प्रश्न उपस्थित करून, त्याचा शोध करा आणि निवड करा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “बहू-बेटिप्रमाणे आपल्या मताचे रक्षण केले पाहिजे. पैशासाठी बहू-बेटी विकत नाही. त्याप्रमाणे आपले मत विकू नका.” याचे भान ठेवून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मताधिकाराचा योग्य उपयोग केला पाहिजे,
कारण महात्मा जोतीराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीति गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.
अत्त दीप भव ????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत