जागतिक धम्मयात्रा आणि संघाचा डाव – प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला धम्म आणि संविधानात केलेली तरतूद यामुळे बौद्ध आणि बहुजन समाज आज आर्थिक दृष्टया समृद्ध झाला आहे. आणि मग त्यात बौद्ध समाज आज अनेक धम्माच्य जगातीलस्थळाला धम्मसहल या नांवाखाली यात्रा सुरू आहेत. आता त्यांना आपण अशा ठिकाणी जात आहोत आणि अशी जागतिक ठिकाणे पाहत आहोत म्हणजे आपण बाबासाहेबांच्या चळवळीचे काहीतरी मोठे काम करीत आहोत असे वाटते आणि मग हे लोक मोठया हुशारीने इतर लोकांना सांगतात आणि मग असे अनेक भारतातील धम्म अनुयायी पुढे यात्रा करतात आणि यामुळे काही धम्मावर काही विपरीत परिणाम तर होत नाही ना अशी मला थोडा विचार केल्यावर शंका आली आणि मग त्यावर आपण आपले विचार मांडावे असे वाटले. म्हणजे आपले जे लोक नौकरी व्यवसायात पुढे गेले ही चांगलीच बाब आहे पण हे फार विद्वान असतात असे नाही तर शिक्षण आणि एखादी परीक्षा पास होणे हे तसे जेमतेम असते आणि दुसरे म्हणजे नौकरी मिळवणे आणि धम्माचे ज्ञान मिळवणे यात खूप फरक आहे. मी अनेक शिक्षक,प्राध्यापक , वकील आणि इतर अधिकारी फार जवळून पाहिले आहेत की, त्यांना धम्माचे ज्ञान फार जेमतेम आहे आणि त्यामुळे यांना कोणीही आपल्या विचारापासून दूर नेऊ शकते. आणि तशी यंत्रणा तर धम्माची दीक्षा आपल्याला दिली त्यापूर्वी पासून कार्यरत आहे.
14 ऑक्टोबर 1956 धम्म आपल्या लोकांना दिल्यानंतर त्याचे ब्रह्मामणीकरण होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी आपणास धम्म आणि सोबत्त 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या पण आपण याचा जास्त गांभिर्याने विचार केला पाहिजे तसा होत नाही. कारण अनेक आपले बौद्ध अनुयायी हे दिशाहीन झाले आहेत. म्हणजे आपण आर्थिक प्रगती करणे वेगळी बाब आहे आणि वैचारिक प्रगती करणे एक वेगळी बाब आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर व्यापार करीत असेल आणि एक नैतिक मार्गाने चांगले पैसे मिळवत असेल तर त्याला एक स्पर्धा सुरू होते आणि मग तो आणखी जास्त पैसे मिळवण्यासाठी जास्त मेहनत करतो जास्त वेळ देतो आणि मग अशा जागतिक धम्म सहलीत सहभागी होतो आणि त्याला आपण फार सुधारलो आणि आपणच खरे धम्माचे अनुयायी आहोत असे वाटायला लागते. परंतु धम्माचे अनुयायी होण्यासाठी त्यास अगोदर तर आपल्या धम्माचा आणि डॉ. बाबासाहेबांनी लिहलेल्या इतर दोन ग्रंथ म्हणजे क्रांती प्रतिक्रांती आणि बुद्ध आणि मार्क्स याचा अभ्यास करावा लागेल त्यावर खूप चिंतन करावे लागेल आणि आपल्या देशात किंवा आपल्या परिसरात जे विद्वान आणि प्रामाणिक लोक आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवू बर्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि मग त्याला धम्म कळेल आणि खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काय कल्पना होती धम्म आपल्याला देण्याची याचा अंदाज येईल. आणि आपण जेव्हा पुढे जातो म्हणजे आपली वैचारिक प्रगती करतो तेंव्हा इतर यंत्रणा अशा असतात की, त्या आपल्याला मागे आणण्यासाठीप्रयत्न करीत असतात आणि हे प्रयत्न जसे आपल्या देशात आहेत तसे जगात सुद्धा मोठया प्रमाणात चालू आहेत आणि त्यापासूनच आपणास जास्त सावध राहावे लागेल. यासाठी पण आर्थिक प्रगतीपेक्षा वैचारिक जास्त पुढे असावे लागते आणि त्यात मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिला आहे तो मूळ स्वरुपात कोणता आहे याचा विचार आपण केला पाहिजे. यासाठी आपणास अनेक महत्वाचे ग्रंथ महाराष्ट्रात आहेत त्या लेखकाने हे फार मोठे उपकार केले आहेत त्यात विशेषकरून मला नागपूर येथील प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांचा उल्लेख विशेषकरून करावा लागेल की, त्यांनी धम्म आणि इतर बाबीवर सत्य आणि समाजाला दिशा देणारे लिखाण केले आहे. इतर सुद्धा लेखक आहेत पण आपण ते वाचन केले पाहिजे आणि त्यासाठी वेळ दिला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी सांगतात की,उद्योग क्षेत्रात जर यंत्राचा वापर वाढला तर मानवाला वेळ मिळेल आणि मग या वेळेचा उपयोग तो मानव त्याच्या कला आणि संस्कृतिक विकासासाठी करेल आणि त्यामुळे शिक्षकी काम स्वीकारले तर त्याचा एक मोठा फायदा असतो की, त्याला वेळ जास्त मिळतो आणि त्यात जर वरिष्ठ महाविद्यालयात असेल तर इतर शासनाची कामे नसतात आणि वेळ जास्त मिळतो त्याचा उपयोग त्याला करता येतो. पण आपले शिक्षक आणि प्राध्यापक जर वाचन करणार नाहीत आणि फक्त विदेशतील धम्मयात्राच करीत बसतील तर मग मात्र त्यांचा वापर संघवाले करतील यात शंका नाही. आणि आज तेच होताना मला दिसत आहे अनेक अधिकारी आणि व्यवसायिक यांना धम्माचे ज्ञान नाही पण यात्रा आणि विपश्यना याचा आधार घेत हे लोक दिशाहीन झालेले आहेत आता विपश्यना हा पुन्हा वेगळा मुद्दा आहे पण आपण या लेखात धम्म यात्रा हाच विषय घेतला असल्यामुळे त्यावर जास्त विचार करू.
आपले धम्म बांधव नेपाळ , श्रीलंका अशा विहतनाम अशा अनेक देशांना जातात आणि मग अनेक देशात असे एक वातावरण तयार केले आहे आर.एस.एस. सारख्या संघटनेने की, आपल्या लोकांच्या मनात जे अनेक अंधश्रद्धात लोक आहेत त्यांना पुन्हा त्याच मार्गावर गेले पाहिजे अशी त्याची व्यूहरचना आहे. म्हणजे समजा आपल्या धम्मात पूनर्जन्म नाही हे आपल्या तथागत बुद्धाने सांगितले आहे. पण काही तरी काल्पनिक कथा तयार करून हे लोक आपल्या लोकांच्या मनावर बिंबवितात आणि मग आपल्या लोकांना खरे वाटते. कारण आपला पहिलाच विश्वास होता पण आता बुद्धाच्या विचाराने आपण थोडे बाहेर येण्याचा प्रयत्न करीत आहोत पण आपल्यापेक्षा संघाच्या लोकांचे प्रयत्न जास्त झाले आणि त्यामुळे ते त्यांचा डाव साधण्यात यशस्वी होत आहेत असे दिसते आहे. बौद्ध धम्माचे आचरण कसे करावे याबद्दल एक सिंहली लोकांचे ब्रीद आहे की, “ Without Buddhism death is preferable.” हे जगातील लोकांनी जोपासले पाहिजे तरच आपल्याला आपण तथागताचे अनुयायी आहोत हे सिद्ध करता येईल. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आपला आणि जगाचा उद्धार फक्त बुद्ध धम्मच करू शकतो. पण आता आपले असे झाले आहे की, आपले संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रामणे तुज आहे तुजपाशी पण तू जागा चुकलाशी म्हणजे जगात लोक बुद्ध धम्माकडे वळत आहेत आणि आपली भूमी बुद्धाची आहे आणि जगात आपल्या धम्माचा प्रचार नसतांना आणि कोणतेही आमिष आणि भीती नसतांना लोक आपणहून धम्म स्वीकारत आहेत. आणि आपल्याकडे लोक ज्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला नागपूरला धम्म दिला पण त्याचे महत्व आपणास समजत नाही. आणि आपण आपल्या बापाने आपणास काय दिले आणि काय सांगितलेले आहे हे सोडून हे आर.एस.एस. वाले काय सांगतात याला महत्व देऊन तिकडे पळत आहोत.
या देशात बुद्धाचा धम्म आणि भारतीय संविधान जर एखाद्या ब्रह्मामण व्यक्तीने लिहले असते तर या देशात त्याची मंदिरे आणि जयजयकार करून लोकांनी त्याला सर्वात मोठा महान व्यक्ती घोषित केले असते. पण आपल्या बाबासाहेबांनी एवढे महान कार्य केले पण आपलेच लोक त्यांच्या विचारांना सोडून या फसव्या लोकांच्या नादी लागले आहेत आणि त्यात पुन्हा विशेष काय तर शिक्षित आणि उच्च शिक्षित लोक जास्त आहेत हे बघून त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला.” ही आज सुद्धा मनाला पटत आहे. उलट आपण जे जे उच्च शिक्षित आहेत त्यांनी आपल्या ग्रामीण आणि कमी शिक्षित लोकांना आपला धम्म काय आहे आणि आपण त्याला पुढे नेण्यासाठी काय करायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले पाहिजे. आज आपला उच्च समाज चार पैसे जवळ आले म्हणून आपल्या गरीब समाजापासून लांब जात आहे आणि अशा धम्मयात्रा आणि शिबिरे यात सहभागी होऊन आपल्या धम्माचा गाडा मागे नेत आहे.
यावर एकच उपाय मला वाटतो आणि तो फार अवघड नाही. कोणताही धर्म असेल आणि त्यात आपला धम्म आहे तर तो पालन करतांना आपल्या अनुयायांना तो 100 टक्के पालन करणे अवघड आहे पण निदान आपण जे जे विचार आणि तत्व आपल्याला पालन करण्याचे जमेल ते करावे पण एक मात्र कटाक्षाने पाळावे आणि ते म्हणजे आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या विरुद्ध आणि त्याला नुकसान होईल असे वर्तन आपण करू नये. आणि यासाठी आपण आपला धम्म आणि 22 प्रतिज्ञा याचा विचार जास्त करणे आणि मग इतर काय सांगतात त्याचा विचार न करणे हे जर पथ्य आपण पाळले तर आपणास इतर कोणताही धर्म बाधा पोहोचवू शकत नाही. पण आपले लोक आणि त्यात पुन्हा उच्च शिक्षित लोक धम्मयात्रा , विपश्यना आणि इतर शिबिरे यांच्या नादी लागून आपल्या शुद्ध आणि मुळ धम्मापासून दूर जात आहेत. आणि हे सर्व आर.एस.एस. चे लोक आपल्या लोकांना दिशाभूल करण्यासाठी तयार आहेत. कारण यांना सर्वात मोठा धोका आपल्या विज्ञानवादी धम्मापासूनच आहे इतर धर्म त्यांचे फार नुकसान करणार नाहीत. आणि आपला धम्म सुद्धा बहुजन समाजाचे कल्याणच करणार आहे आणि त्यामुळे देशात सर्वात जास्त ओढा लोकांचा धम्माकडे आहे आणि आपण पाहतो की,अनेक राज्यात लोक बौद्ध धम्म याकडे आकर्षित होत आहेत. त्यांना आज समजले आहे की,आज आपल्या जीवनात ज्या अंधविश्वास आणि प्रथा आहेत त्या फक्त बुद्धाचा धम्मच आपल्यातून कमी करू शकतो. आणि तर्क करण्याची क्षमता फक्त धम्मच देऊ शकतो कारण इतर धर्म चिकित्सा करण्याची परवानगी देत नाहीत. आणि त्यांच्या धर्मात ते जे सांगतील ते त्यांना विचार आणि चिकित्सा न करता ऐकावे लागेल. आणि त्यामुळे लोक आज बुद्ध धम्माकडे येत आहेत आणि जगाचे कल्याण शेवटी बुद्धाचा धम्मच करणार आहे हे मी त्याचा एक साधारण अनुयायी आहे म्हणून सांगत नाही तर जगातील जे जे विद्वान आणि शास्त्रज्ञ आहेत त्यांचे हे मत आहे. आणि जगातील प्रत्येक शास्त्रज्ञ यांनी अगोदर बुद्धाच्या धम्माच्या तत्वाचा अभ्यास केला आणि मग त्यांचे शोध लावले. आणि शेवटी ते ध्म्माकडे आले म्हणजे स्वीकारला एवढी या धम्माची कसोटी महान आहे. स्टीफन हॉकिंग सारखा शास्त्रज्ञ जीवनात शेवटी या निष्कर्षावर आला की, हे जग देवाने निर्माण केले हे सत्य नाही आणि शेवटी तो म्हणतो की, बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे. आता बघा अशा लोकांची बुद्धी किती तेज असेल आणि त्यांनी किती विचार करून हे वाक्य सिद्ध केले असेल.
ओशो राजनीश मी काही त्यांचा अनुयायी किंवा चाहता नाही पण त्यांचे वाक्य आहे की, “ गौतम बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने निर्माण केला नाही.” म्हणजे जगात या महामानवाला तोड नाही आणि आपल्याला बाबासाहेबांनी एवढा श्रेष्ठ धम्म दिला. आणि आपण त्यांना समजून न घेता इतर लोक ज्यांना कोणी जगात विचारत नाही त्यांच्या मागे लागलो आहोत. आज जगात अनेक आश्रम या ओशोचे आहेत आणि खूप मोठया प्रमाणात त्यांचे अनुयायी आहेत पण शेवटी यांना बुद्धाला श्रेष्ठ मानावेच लागले. हे आपण कधी समजून घेणार आहोत? आपण एक उपासक म्हणून रोज घरात आपल्या तथागताने सांगितलेल्या गाथा आणि वंदना घ्या आठ दिवसाला घ्या याल अनेक पर्याय आहेत पण इतर लोकांच्या नादी लागू नका हे जास्त महत्वाचे आहे. म्हणजे हे थोडे धाडसाचे होईल पण एखदया व्यक्तीला समजा एखादी वाईट सवय आहे जी आपल्या धम्माच्या विरुद्ध आहे तरी नुकसान कमी आहे पण जर एखाद्या व्यक्तीला कोणतेच व्यसन नाही हे आपण चांगले म्हणू, त्याचे कौतुक करू पण जर अशी निर्व्यसनी व्यक्ती जर एखाद्या आर.एस.एस. च्या जाळ्यात अडकली तर मात्र जास्त नुकसानकारक आहे कारण पहिला धोका त्याच्या शरीराला आहे पण दूसरा धोका संपूर्ण समाजाला आहे म्हणजे इथे आपण व्यसनी लोकांचे समर्थन करीत नाही पण तुलनेत नुकसान किती आहे याचा विचार करीत आहोत. म्हणून एखादा व्यक्ती धम्माचे पालन करतो आणि 22 प्रतिज्ञा पाळतो त्याला तर आपण वंदन केले पाहिजे. पण आपल्या धम्माला दिशाहीन करीत असेल तर ते मात्र जास्त वाईट आहे.
स्वामी विवेकानदांना आपण भारतीय मानतो आणि त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की ,“ बुद्धाचा हजारावा अंश माझ्यात असता तर मी,स्वत:ला धन्य समजलो असतो.” म्हणजे आण्णा हजारे म्हणतात की, ते आत्महत्या करायला निघाले होते आणि त्यांनी स्वामी विवेकानंद वाचले आणि ते आत्महत्या करण्यापासून परावृत्त झाले पण मला असे म्हणायचे आहे की,जर त्यांनी पुढे कांही दिवसांनी तथागत बुद्ध वाचले असते तर ते आण्णा आंदोलनात फसले नसते आणि त्यांच्या सामाजिक जीवनाचे हसे झाले नसते. म्हणजे त्यांना सहज या आर.एस.एस. च्या लोकांनी फसविले आणि भाजपा सरकार आले आणि आज सर्व बोंबा मारतात पण जेंव्हा आंदोलन सुरू होते त्यावेळी मात्र त्यांची वाहवा चालू होती. पण आणा हजारेना या लोकांनी का फसविले तर त्यांनी एखादी बाब चिकित्सा करू स्वीकारली पाहिजे हे त्यांना माहीत नव्हते. आणि त्यामुळे त्यांच्या इमेजचा वापर करून सर्व लोकांनी आपली पोळी भाजून घेतली. आज त्यांना पश्चाताप होत आहे पण आता काय उपयोग आहे ? म्हणजे आणा ज्या भ्रष्टाचाराचा तिरस्कार करीत होते तो आज सर्वात जास्त होत आहे पण आता ते कोणत्या तोंडाने लोकांना सांगणार कारण त्यांनीच आंदोलन करून हे सरकार आणले आहे. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली तर आपण पुढे फसत नाही. आणि आज आपले बौद्ध अनुयायी हेच करीत आहेत. आज बाहेर देशाला जाऊन काहीतरी पाहतात आणि मग लोकांना सांगतात पण त्यांना हे माहीत नाही की, मुळात धम्म हा आपल्या देशातील आहे आणि आपल्याला इतर देशाकडुन काहीच शिकण्याची गरज नाही. पण आता हे बाहेर देशाला जाऊन आलेले असतात आणि त्यांना आपण बाहेर देशाला जाऊन आलो म्हणजे काहीतरी मोठे काम केले आहे आणि आपल्याला काहीतरी फार मोठे ज्ञान मिळाले आहे. आशा आविर्भावात लोकांना सांगतात आणि मग तेच दिशाहीन झालेले असतात. आणि मग आपल्याकडे काही लोक असतात त्यांना हे सर्व माहीत असते त्यांनी अशा लोकांना सांगतांना पाहिले की, मग वाद होतात आणि मग यात बरीच एनर्जी वाया जाते आणि मला तर वाटते हा सुद्धा आर.एस.एस.चा डाव असला पाहिजे. म्हणजे आपल्यात दोन गट निर्माण करायचे आणि मग आपण बसतो चर्चा करीत आणि मग आपले विचार पुढे जात नाहीत. आणि समाज गोंधळात पडतो आणि हाच या प्रतिक्रांती वाल्यांचा डाव आहे.
जगात आपल्या धम्माला बदनाम करण्याची एकही संधी ब्रह्मामण सोडत नाहीत कारण त्यांना काही अधिकार मिळाले की, ते त्याचा पुरेपूर फायदा घेतात अशीच एक घटना चीन देशातील आहे. या देशात कुमारजीव नांवाचा ब्रह्मामण चीन मध्ये इ.स. 401 मध्ये गेला त्याने चीनच्या सम्राटाची भेट घेतली आणि त्याने कुमारजीवाला चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची जबाबदारी दिली. आणि त्याने भारतातून आणलेल्या 100 ग्रंथांचे भाषांतर केले आणि तो भाषांतर करण्यात इतका पटाईत होता की, लोकांना असे वाटत असे की, हे मूळ ग्रंथ चीनी भाषेतच असले पाहिजे. आणि त्याच्या या कुशलतेचा त्याने एवढा मोठा गैरफायदा घेतला की, आणि सर्व ग्रंथात त्याने बौद्ध मूळ ग्रंथातील काहीच भाग घेतला नाही तर इतर भाग आणि तो म्हणजे ध्यान आणि समाधी याविषयीच माहिती दिली. आणि त्यामुळे चीन सारख्या देशात ध्यान , समाधी आणि विपश्यना याला महत्व आले आणि हाच खरा धम्म आहे असे लोकांना वाटू लागले. परंतु आता एवढा इतिहास कोणाला माहीत असणार आहे ? कारण आपण कितीही वाचन केले तरीही हा संदर्भ वाचण्यात आला तरच आपल्याला कळेल नाही तर कळणार नाही. आता मलाही वाटत होते की, आपण बरेच ग्रंथ वाचतो पण जेंव्हा हा संदर्भ वाचला तेंव्हा कळले आणि मग हा विषय घेतला. आणि त्यामुळे इतर अनेक देशात आपल्या धम्मातील अनेक महत्वपूर्ण तत्वे जसे देव , आत्मा , पुनर्जन्म नाही तसेच ध्यान , समाधी आणि विपश्यना हे धम्मात नाही पण आता एक फॅशन म्हणून हे सर्व केले जाते आणि लोकांना हे सर्व केले की, आपण काहीतरी मोठे काम केले असे वाटते. कारण फार पूर्वीपासून भारतीय लोकांना विदेशातील लोकांचे विनाकारण आकर्षण आहे आणि हे तसेच आहे. वास्तविक या बाबी धम्माच्या विरोधी आहेत.पण आपले लोक हे समजून घेत नाहीत. आज विदेशातील अनेक घटना पाहून आपले लोक दिशाहीन होत आहेत. मागे एक आपलाच धम्म अनुयायी पण अर्धवट असलेला पण तो विदेशात धम्मयात्रा करण्यासाठी गेला होता आणि त्याला या आर.एस.एस. च्या लोकांनी पूर्ण माइंड कंट्रोल केलेले आहे. त्यामुळे त्याच्या बोलण्यात तसे शब्द येत होते. पण माझा आणि त्या व्यक्तीचा फार जास्त परिचय नव्हता आणि त्यामुळे मी त्याला फार जास्त बोललो नाही पण त्याने मला एक मोबाइलवर एक व्हिडिओ दाखवला त्यात एक सात वर्षाचा भुतान येथील राजकुमार आहे आणि त्याला सर्व 2400 वर्षा पूर्वीचे आठवत आहे की, तो नालंदा येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी होता आणि मग ते सर्व कुटुंब भारत भेटीवर आले आणि लोक त्याची चर्चा भारतात करू लागले आणि कांही लोकाना त्यावर विश्वास सुद्धा बसू लागला आणि ते आपले बौद्ध अनुयायी होते. आता काय करणार आपण ? मी त्यांना खूप सांगितले पण त्यांना काही पटत नव्हते शेवटी मी त्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा संदर्भ दिला पण त्यांना काही पटेना मी तर हताश झालो आणि शेवटी तेथून आलो आणि त्यांना सांगितले की, आपला धम्म ग्रंथ चांगला वाचा पण शेवटी मला वाटले की, या कामात तर आर.एस.एस. चे लोक यशस्वी होत आहेत आणि आपल्यासाठी हा फार मोठा धोका आहे.
आपल्या शिक्षित लोकांना आपल्या धम्माचे महत्व कमी आणि त्यांचे महत्व जास्त वाटत आहे. आणि यांना हे स्लो पोयझन कसे काम करते हे आणखी माहीत नाही. असे आपले अनुयायी शिक्षित आहेत पण विचारी नाहीत याचा हा धोका आहे.
जगात 2009 यावर्षी जिनेव्हा येथे एक सर्व धर्माची परिषद भरली आणि यात हिंदू धर्मासहित 200 धर्माच्या प्रतींनिधींनी एकमताने मान्य केले की, आधुनिक युगात एकच असा धर्म आहे जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे बौद्ध धम्म आहे. आणि 2500 वर्षानंतर असे सर्वोच्च स्थान निर्माण होण्याचे श्रेय तथागत बुद्धाला जाते. आणि दुसरे श्रेय त्यांनी निर्माण केलेल्या भिकखू संघाला जाते. परंतु पुढे जेंव्हा 13 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यानंतर एक चूक आपल्या लेखक आणि साहित्यिक लोकांकडून झाली आणि ती म्हणजे त्यांनी संदर्भ मूळ साहित्याचा न घेता ब्रह्मामण लोकांनी जे साहित्याचे विकृतीकरण केले त्याचा संदर्भ घेतला आणि त्यामुळे हे स्वरूप बदलले आणि समाजात हेच साहित्य लोक वाचू लागले आणि तेच लोकांना सांगू लागले.
या जगात ब्रह्मामण एक अशी जमात आहे की, कितीही काळ लोटला तरी ते त्यांच्या ध्येयापासून दूर जात नाहीत आणि ध्येय कधी विसरत सुद्धा नाहीत आणि म्हणून आर.एस.एस. फक्त मार्ग बदलतो पण आपले उद्दिष्ट्ये कधीच बदलत नाही आणि हे आपणास याकाळात सुद्धा दिसेल. आर.एस.एस. ने 20 फेब्रुवारी 2011 या दिवशी राष्ट्रीय स्तरावर “ राष्ट्रीय धम्म क्रांती महासंघ ” या नांवाचा बौद्ध भिकखू संघ स्थापन केला याचे उदधघाटन भाजपाचे अध्यक्ष नितिन गडकरी यांच्या हस्ते केले. आणि आपली धम्मक्रांती नष्ट करण्यासाठी त्यांनी संस्कृतिक , सामाजिक , राजकीय आणि शैक्षणिक अशा स्तरावर उपशाखा निर्माण केल्या आणि यांचे प्रमुख सर्व चिवरधारी भिखकु निर्माण केले. म्हणजे बघा किती कुटिल नीती असते आणि आपण एक धम्माचे अनुयायी म्हणून किती सावध राहिले पाहिजे याचा आपणास अंदाज येईल. आणि याचा अंदाज आपणास 2023 रोजी सुद्धा आला असेल की, एक आपली धम्म भगिनी बनसोडे ताई म्हणाल्या की, “ जेंव्हा आपण दीक्षाभूमीला दरवर्षी सोहळा साजरा करतो तो करतांना आपण भाजपा आणि आर.एस.एस. सारख्या संस्थेत काम करणार्या लोकांना का बोलवतो ?” तर त्यांनी यावर एक मोठा 30 मिनिटपेक्षा जास्त मोठा व्हिडिओ तयार करून तो प्रसारित केला आहे आणि त्याची दखल आपल्या नागपूर येथील स्मारक समितीने घेतली पाहिजे अशी सर्व महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायाची मागणी आहे. म्हणजे सतत हे लोक त्यांचे काम करतात पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपले लोक त्यांना साथ देतात आणि हे जास्त धोकादायक आहे आणि पूर्वीपासून हेच झाले आहे. आपल्या लोकांनी मग ते धम्माचे काम असेल सामाजिक किंवा राजकीय असेल आपले लोक सावध असले पाहिजे. दीक्षाभूमी वर कार्यक्रमाला या लोकांना कशाला बोलवता ? हेच कळत नाही.
7 ऑक्टोबर 2000 साली सुद्धा दीक्षाभूमी स्मारक समितीने सत्यनारायन गोयंका यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले त्यावेळी ते म्हणाले, “ सिद्धार्थ गौतमाने कोणताही धम्म शिकविला नाही. विपश्यना ही वैदिक ब्रह्मामणी परंपरा आहे.” असे गोयंका म्हणाले आणि या अगाध ज्ञानाने भारावून गेलेले रा.सू. गवई म्हणाले “ भारत बौद्धमय करण्याचे (डॉ. बाबासाहेब यांचे स्वप्न ) स्वप्न फक्त गोयंकाच पूर्ण करू शकतात,” असे विधान करणार्यांची किव करावीशी वाटते. गोयंका पहिल्या दिवशी दिक्षाभूमीवर जातात आणि दुसर्या दिवशी आर.एस.एस. च्या कार्यालयास भेट देतात. ( संदर्भ : मुलानिवासी नायक दि. 22 जून 2014 , लेखक : प्रवीण गडलिंग ,पुणे ) आता सांगा अशी स्थिती असेल तर आपला धम्माचा गाडा पुढे जाईल कसा ? आणि आपल्या सामान्य बौद्ध उपासकांना दिशा कशी मिळणार ? हा महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपण उच्च शिक्षित लोकांनी सतत सावध आणि प्रामाणिक भूमिका घेतली पाहिजे. आज आपल्या समाजात उच्च शिक्षित मोठया प्रमाणावर लोक आहेत पण दिशा असलेले आणि प्रामाणिक लोक फार कमी आहेत. आज मोठमोठे साहित्यिक आणि विचारवंत यांना कांही अमिषे दिली की,ते सर्व आपली धम्माची चळवळ सोडायला तयार होतात. आणि आर.एस.एस. चे लोक फुकट काम करतात आणि तेही रात्रंदिवस करतात आणि आपण पुन्हा म्हणतो की,ये यशस्वी कसे होतात तर त्यांचा त्याग मोठा आहे. म्हणजे मी बर्याच वेळा सांगतो की, त्यांचे काम हे देशविरोधी आहे पण ते काम प्रामाणिकपणे करतात आणि त्यामुळे ते यशस्वी होतात आणि आपले काम समाज उपयोगी आहे पण आपण प्रामाणिक करीत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला यश मिळत नाही.
प्रत्येक काळात हे काम चालू आहे आपण यापासून सावध राहिले पाहिजे. मध्ये एक संदर्भ वाचण्यात आला होता की, सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा ब्रह्मामनांनी बौद्ध भिखूचे चिवर धारण करून छुप्या पध्दतीने बौद्ध संस्कृती नष्ट करण्यासाठी हे काम चालू होते पण सम्राट अशोकाने इ.पू. 254 मध्ये हे सर्व नकली भिख्खू शोधून त्यातील 60 हजार भिख्कुना संघाच्या बाहेर हाकलून द्यावे लागले. यासाठी आपण आता सावध राहिले पाहिजे. म्हणून आपल्या धम्मात जरी सांगितलेले आहे की, कोणीही आला तरी त्याला धम्माची दिक्षा दिली पाहिजे पण आपण आता थोडा बदल केला पाहिजे आणि हे स्वातंत्र्य आपणास तथागत बुद्धाने दिले आहे. कारण बुद्धाच्या काळात काही हा आर. एस. एस. नव्हता आणि त्यामुळे हे लोक पुढे एवढा घात करतील याचा अंदाज बुद्धाला सुद्धा नसेल पण डॉ. बाबासाहेबांना होता आणि त्यामुळे त्यांनी आपणास 4 डिसेंबर 1954 ला इशारा दिला आहे की, या ब्रह्मामण लोकांना कोणताही अधिकार पदावर घेऊ नका आणि त्यांना विहारातून बाहेर काढा. त्याची आज आपल्याला गरज आहे. आज आर.एस.एस. सारखी संस्था अनेक धार्मिक ,सामाजिक संस्थात घुसून गोंधळ आणि कामात व्यतय आणत आहेत. पण आपल्या बहुजन समाजाला हे लक्षात आले पाहिजे. महाराष्ट्रात एवढी मोठी एक परंपरा आहे वारकरी संप्रदायाची पण त्यांना सुद्धा प्रशिक्षण देणार्या संस्था यांनी निर्माण केल्या आहेत. आणि समाजाला दिशाहीन करण्याचे काम अनेक वर्षापासून चालू आहे. पण आपक्या बहुजन समाजाला यांची चाल आणि डाव कळाला प्पहिजे . आता विशेष हे आहे जो समाज आंबेडकरी समजतो आणि आपण खूप जागृत आहोत आणि खूप पुस्तके वाचणारा आणि पुस्तके विकत घेणारा समाज आहे असे स्वत:ला समजतो त्यांना हे लवकर समजू देत नाहीत, तेंव्हा इतर समाज तर अगोदरच अनेक मार्गाला लागला आहे की,ज्यामुळे त्यांना विचार करायला वेळ नाही आणि त्यामुळे निदान आंबेडकरी समाज तरी सावध असला पाहिजे. आणि त्यामुळे हा लेखनप्रपंच आहे. आपले आदर्श बाबासाहेब आहेत. आणि त्यांचे वाक्य आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा होता की, “आम्ही आर.एस.एस. सारख्या प्रतिक्रियावादी संघटनेशी संबंध ठेवणार नाही.” तर मग आम्ही त्यांचे वारसदार काय करीत आहोत याचे भान आपण ठेवले पाहिजे.
आपण जगातील धम्म यात्रा जरूर करा ज्यांना हे शक्य आहे त्यांनी करावी त्यात वाईट काहीच नाही उलट जगाची माहिती आपणास होते. पण अशा यात्रा करतांना या धम्मात ज्या बाबी नंतर आलेल्या आहेत त्यांचा प्रभाव मात्र आपल्यावर होता कामा नये, नाही तर आपण बाहेर देशाला गेलो नाही तेच बरे झाले अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि आज तशी स्थिती दिसत आहे. म्हणून अगोदर आपण आपल्या बौद्ध साहित्याचा चांगला अभ्यास करावा आणि आपल्या देशात जे विचारवंत आहेत की, ज्यांनी बाबासाहेब आणि बुद्ध योग्य मांडला आहे त्यांना वाचन करा त्यावर चिंतन करा आणि मग तुम्ही गेलात तर काही नुकसान होणार नाही उलट काही फायदा होईल निदान बाहेर फिरून आल्याचा एक वेगळा अनुभव तर मिळेल. आणि आपल्या समाजाला सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. आणि आपल्याकडे आजकाल गर्व सुद्धा खूप वाढला आहे कोणी कोणाचे ऐकायलाच तयार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती बाहेर देशातून आला म्हणजे काय डायरेक्ट बुद्धी विकत घेऊन नाही आला, तर बुद्धीत वाढ करण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि दीर्घकालीन आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. हे अगोदर सुद्धा अनेक लेखात सांगितले आहे की, आपण जर स्वत:ला परिपूर्ण समजायला लागलो की, समजा आपली अधोगती सुरू झाली आहे. कारण या जगात परिपूर्ण असा कोणी नाही आपण फक्त प्रत्येक क्षणाला काहीतरी नविन मिळविण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण पुढे जात राहतो आणि जीवन असेच आहे प्रत्येक नविन मिळवत जाणे आणि लोकांना सांगणे पण गर्व नको कारण त्यामले अधोगती होणार आहे. आज आपण प्रत्येक व्यक्ती स्वत:ला कोणीतरी आहे आहे असे समजतो आणि त्यामुळे मग आपले संवाद कमी झाले आहेत. मला तर संवाद करायला आवडते पण लोक आपल्या कोशातून बाहेर येण्यास तयार नाहीत. आणि मी अनेक लोक पाहिले आहेत त्यांना फार काही समजत नाही पण गर्व इतका आहे की, ते कोणाला बोलायला सुद्धा तयार नाहीत. लोक म्हणतात आता जग खूप जवळ आले आहे मोबाइल क्रांती झाली आहे पण उलट पहिलेच चांगले होते. आज लोक कोणी कोणाला संवाद करायला तयार नाही. आपलेच विश्व आहे आणि त्यात ते मश्गुल आहेत. आणि शेवटी एक दिवस आपल्याला जायचे आहे या जगातून मग काय करणार आहे एका कवीने म्हटले आहे की, पुढे कधीतरी काही विचार करण्यापेक्षा आज तो आपण केला पाहिजे. म्हणजे पुढे काही दिवसांनी आपण एखाद्या व्यक्तीला भेटणार आहोत काहीतरी बोलणार आहोत पण मधेच आपण जर काही कारणामुळे गेलो तर मग ? त्यासाठी आजच म्हणजे वर्तमान जगा आणि जे असेल मनात ते बोलून टाका म्हणजे काही अपूर्ण राहिले आहे याची खंत नको याची काळजी प्रत्येकाने घ्यावी आणि आपले पुढील जीवन जगावे एवढी माफक अपेक्षा आहे.
अपल कंपनी काढणारा स्टिव्ह जॉब्स म्हणतो, “ मरणाचे भान सतत असले की, आपण वेळ वाया घालवत नाही यशापयश वगैरे सर्व भौतिक भावना मरणात संपून जातात. आपण काहीतरी गमावणार आहोत ही भावना आपणास मृत्युच्या जाणिवेने नग्न करते याच भान आले की, एक प्रश्न त्यावर पुरून उरतो “ जो काही वेळ आपणास मिळालेला आहे, याच काय केल ते सत्कारणी लावला का ?”
बौद्ध धर्म स्वीकारलेला स्टिव जॉब्स पुढे म्हणतों, “ थडग्यात जाताना जगातील सर्वात श्रीमंत माणूस असे
माझ्या बाबत कोणी म्हणावे यात मला आकर्षण नाही,माला इच्छा आहे की, याने कांही सुंदर करून दाखवले अशा प्रतिक्रियेची.”
यावरून आपण जीवनाची कल्पना करू शकतो आणि समजू शकतो की,जगात शेवटी तुम्ही कितीही पैसा कामावला तरी यापेक्षा तुमचे कार्य समाजाला किती उपयोगी पडले हे जास्त महत्वाचे आहे. आणि आपण तर इतके छोटे असतो पण आपला गर्व जास्त मोठा असतो. आणि त्यामुळे आपण सर्व समाजाला जागृत करण्याचे काम करावे आणि ते प्रामाणिक आणि सावध राहून करावे म्हणजे आपल्याकडून समाज दिशाहीन होणार नाही.
प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
नाशिक ( 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत