निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि गोडावूनमध्ये न खपलेली १७ रुपयांची साडी वाटायची, हा कसला धंदा ? – बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यावर टीकास्त्र

अमरावती : महाराष्ट्रात सध्या लोकसभा 2024 च्या अनुषंगाने सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे अमरावती मतदारसंघ.
येथे भाजपा ने मित्रपक्षात असलेल्या बच्चू कडू, अडसूळ आणि असंख्य स्थानिक कार्यकर्ते यांच्या विरोधाला न जुमानता “हनुमान चालीसा प्रकरणी जेल भोगून आलेल्या नवनीत राणा” यांना उमेदवारी दिली आणि प्रहार ने युतीमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली.

कांहीही झालं तरी अमरावती तून लढणार हा संकल्प केलेल्या प्रहार पक्षातर्फे दिनेश बुब यांनी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बच्चू कडू यांनी भाजपसह राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. जातीधर्माचे प्रश्न महत्त्वाचे नसून शेतीचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न महत्वाचे असल्याचे सांगत अमरावतीची निवडणूक महाराष्ट्राला दिशा दाखवेल, इथे सत्तेचा माज आणि पैसाचा वापर चालणार नाही, असे सांगत अमरावतीतून नवनीत राणा विजयी होणार नाही, असे ठणकावून सांगितले.

केवळ पैसा आणि सत्ता असल्यामुळे राणा दाम्पत्य आमदार खासदार आहेत पण निवडणूक निकालानंतर सर्वांना समजेल की येथे पैसा आणि नेतागिरी चालणार नाही, लोकांच्या समस्यांवर लक्ष देऊन काम करणाराच निवडून येईल, आपल्याला इथल्या बेरोजगारी, पाणी, शेतमालाला भाव या मुद्द्यावर बोलणारे लोक हवेत. धर्मावर बोलणारे अनेक लांडगे तुम्हाला दिसतील, मुद्द्यांवर बोलणारी औलाद निर्माण करायची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!