आनंदराज आंबेडकर यांची अमरावती मतदार संघातून माघार; वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा, भाजपा ला फायदा होऊ देणार नाही.
अमरावती : भाजपा नेते वारंवार संविधान बदलाची भाषा करत आहेत आणि त्यामुळे अशा जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती मतदार संघातून उमेदवारी स्पष्ट केली होती.
मात्र मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा भाजपा ला होऊ नये यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी भरलेला अर्ज मागे घेत लोकसभा निवडणुकीतुन माघार घेतली आहे. भाजपाला सडेतोड उत्तर फक्त वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते म्हणून आघाडीच्या उमेदवाराला आनंदराज आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजप निवडून येऊ नये यासाठी वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रातून माहिती दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. सुभाष हेमसिंग पवार यांच्या ऐवजी अभिजित लक्ष्मणराव राठोड यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित राठोड हे आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सुभाष राठोड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत