मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 215 निवासी गाळे खरेदी करण्याची संधी, म्हाडाचा सरकारडे प्रस्ताव.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाने नोकरदार, कष्टकरी महिलांसाठी दक्षिण मुंबईमधील ताडदेव येथील मोक्याच्या ठिकाणी 23 मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या वसतिगृहात 860 महिलांच्या निवाऱ्याची सोय होणार आहे. प्रकल्पासाठी 65.80 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेत 300 चौरस फुटांचे 215 निवासी गाळे खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना मिळणार आहे.
या जोजनेत तळमजल्यावर एटीएम, लॉन्ड्री, दवाखाना, औषधाचे दुकान असणार आहे. पहिल्या मजल्यावर उपाहारगृह तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर वाहनतळ प्रस्तावित आहे तर चौथ्या मजल्यावर योगासन आणि मनोरंजनासाठी जागा मिळणार आहे.उर्वरित 23 मजली वसतिगृहात 860 महिलांची राहण्याची सोय होणार आहे.
म्हाडाने शिक्षण, नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्या तरुण-तरुणींसाठी जिजामाता नगर येथे 18 मजली वसतिगृहाचे बांधकाम हाती घेतले आहे. तर, आता ताडदेव येथे नोकरदार महिलांसाठी 23 मजली वसतिगृह बांधण्याचा निर्णय म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव 14 सप्टेंबर रोजी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या 298 व्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
या वेळी प्रकल्पाच्या अंदाजित 65.80 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तर, हा प्रकल्प मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविण्यासही मान्यता देण्यात आली. ताडदेव येथे एमपी मिल कंपाऊंड येथे म्हाडाचे संक्रमण शिबीर आहे. या शिबिरातील सात इमारतींच्या पुनर्विकासाअंतर्गत नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत