‘घड्याळ’ चिन्हाविषयीच्या अंतरिम आदेशाचे पालन न केल्यास गंभीर दखल घेतली जाईल ! – सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला दणका.
नवी दिल्ली: शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत अजित पवार आपल्या समर्थकांसह वेगळे झाले. निवडणुकांच्या आधीच हा निर्णय घेतला गेल्यामुळे हा वाद कोर्टात गेला आणि अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर दावा केला.
सर्वोच्च न्यायालयानं मात्र अजित पवार गटाला धक्का देत पक्षचिन्हं न्यायप्रविष्ठ असल्याची जाहिरात अजित पवार गटानं मराठीसह हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी आणि निवडणुकीशी संबंधित प्रचार पत्रक, संदेश आणि इतर प्रचारविषयक संदर्भांसह चित्रफितींमध्ये ‘न्यायप्रविष्ट’चा उल्लेख करावा असा आदेश दिला.
सदर आदेशाची अंमलबजावणी केली गेली नसल्याची तक्रार शरद पवार गटाकडून केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला पद्धतशीर खडसावलं असून निवडणुकीच्या तोंडावर अडचणींमध्ये भर घातली आहे.
‘घड्याळ’ चिन्हाविषयी देण्यात आलेल्या अंतरिम आगेशाची पायमल्ली केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशाराच सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. ज्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटापुढं नवी आव्हानं उभी राहिल्याचं स्पष्ट होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत