मोदींना राखी बांधणाऱ्या गवळींच्या “भावना” बेदखल; शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता
यवतमाळ : ED चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केलेल्या भावना गवळी यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान भावना गवळी यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत. त्या दोन दिवसांपासून मुंबई मध्ये तळ ठोकून आहेत परंतु त्यांची ही धडपड व्यर्थ जाण्याची दाट शक्यता आहे कारण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान शिंदे गटाला आपले उमेदवार बदलावे लागत आहेत यामागे भाजपा चे दबाव तत्र असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधल्यामुळे भावना गवळी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या व नुकत्याच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चाही वाढल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत