नवीन कर प्रणाली बद्दल अर्थ मंत्रालयाकडून स्पष्टीकरण..

मुंबई : १ एप्रिल २०२४ पासुन आर्थिक नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. या निमित्त अर्थ मंत्रालयाने सोशल मिडिया वर अर्थ व्यवस्थेला घेऊन चालू चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
सोशल मिडियावर काही अफवा पसरवल्या जात होत्या. त्यावर अर्थ मंत्रालयाने असे म्हटले आहे की टॅक्स व्यवस्थेमध्ये बदल झालेला नाहीये. कलम 115BAC(1A) अंतर्गत नवीन टॅक्स व्यवस्था फायनान्स ऍक्ट २०२३ मध्ये अस्तित्वात असलेल्या जुन्याच्या तुलनेत सादर करण्यात आले आहे.
नवीन टॅक्स व्यवस्था आता डीफॉल्ट टॅक्स व्यवस्था असली तरी जुनी टॅक्स व्यवस्थाच कायम राहील तर असे देखील म्हटले गेले आहे की जुन्या टॅक्स प्रणालीप्रमाणे विविध सवलती आणि कपातीचा लाभ उपलब्ध नसतानाही, नवीन टॅक्स प्रणाली अंतर्गत, कराचे दर लक्षणीयरीत्या कमी आहेत आणि टॅक्स पेअर्स त्यांच्यासाठी फायदेशीर वाटतील अशी टॅक्स व्यवस्था (जुनी किंवा नवीन) निवडू शकतात. सर्वसाधारण लोकांसाठी टॅक्स भरण्यासाठी मुदत आहे ३१ जुलै २०२४.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत