शिरसगांव येथे बौद्ध धर्मीय उपवर-वधू परिचय मेळावा .
शिरसगांव पांढरी वार्ता.
करुणा बुद्ध विहार समिती व समता बहुउद्देशीय समिती शिरसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच शिरसगाव येथे करुणा बुद्ध विहाराच्या हॉलमध्ये बौद्ध धर्मीय उपवर वधू परिचय मेळावा संपन्न झाला.
विवाह हे पवित्र बंधन आहे. सद्यस्थितीमध्ये विवाह जुळणे, जुळविणे अतिशय कठीण बाब झाली आहे. अनेक उपवर मुला मुलींचे पालक आणि मुलं-मुली सुद्धा याबाबत चिंतेत आहेत. आणि या परिस्थितीचा सामना करीत आहे. संस्थेने नेमकी हीच बाब हेरून याचा विचार करून, बौद्ध धम्मातील व्यक्तींचा पैसा, वेळ, श्रम ,वाचून विवाह योग्य मुला-मुलींना सुयोग्य जोडीदार मिळावा या उदांत भावनेने सदर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संकल्पना चांगली आणि काळाची गरज असल्याकारणाने जवळपास 200 उपवर- वधूं नी आपले नाव नोंदवून देऊन परिचय करून दिला. आणि या कार्यक्रमाला जवळपास 1000 मुला, मुलींचे आई-वडील उपस्थित होते.
वरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर जी तलवारे होते .तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये भरत गवई ,दिनेश गावंडे, उषाताई गवई, सविताताई तलवारे, अजाबराव खंडारे, सौरभ गावंडे, अनंतराव अगम, भिमदास कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम मोहोळ यांनी केले तर प्रास्ताविक केशव अगम यांनी केले. आणि आभार प्रदर्शन सुमेध खडसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रावण अघम ,संघप्रिय सोनोने, गुलाब अघम, आनंदराव भगत, पंजाब अघम, संतोष तायडे, भास्कर तलवारे ,संगीताताई गायकवाड,राजू शेळके , नागसेन अघम यांनी अथक परिश्रम घेतले .वरील कार्यक्रमाचे आयोजन राहुल खडसे अध्यक्ष समता बहुउद्देशीय समिती शिरसगाव यांनी केले होते. ज्या वधूवरांना आणखी नोंदणी करायची असल्यास राहुल खडसे यांच्याशी संपर्क साधावा.त्यांचा संपर्क क्रमांक 97 65462253
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत