महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशालेत मुख्याध्यापकाची कमी

गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी नळदुर्ग येथे राजपत्रीत मुख्याध्यापक देण्याची गरज
या मागणीवर नागरीकानी जोर धरला

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहर एक ऐतिहासिक शहर म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओळख आहे परंतु नळदुर्ग शहरात जिल्हा परिषद प्रशाला मुलांची या शाळेमध्ये अनेक वर्षा पासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्याने तेथील कारभार अनेक शिक्षकानी पाहिला अध्यापन पद्धत आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य आणी गुणवत्ता यावरती चाचपणी होणे गरजेचे आहे
कारण नळदुर्ग शहरांमध्ये अनेक वर्षांमध्ये जिल्हा परिषद प्रशालेला मुख्याध्यापक नसल्याने सदरील प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षी अनेक शिक्षकानी कामे पाहिले परंतु ३० हजार लोक संख्या आसलेल्या ऐतिहासिक शहराला शिक्षण विभागाला राजपत्रीत मुख्याध्यापक मिळत नसल्याने नागरीकात संतापाची लाट पसरली आहे . या शिक्षण विभागाच्या गलथान कारभारा मुळे नळदुर्ग या ऐतिहासिक शहरांमध्ये जिल्हा परिषद प्रशालेची पटसंख्या कमी झाली आहे आणि त्यामधून विद्यार्थी ची गुणवत्ता ही ढासळलेली दिसुन येते शिक्षकांनी केलेले अध्यापन आणि विद्यार्थाची गुणवंत्ता एक चिंतेचा विषय बनला आहे .
कारण जिल्हा परिषद प्रशालेत फक्त गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शिक्षण घेत आसतात ते ही शिक्षण समूहाच्या वाटचालीत दर्जेदार शिक्षण मिळत नाही शिक्षणाचे धडे देणारे शिक्षक आणि अध्यापन करण्याची अवस्था आणि विद्यार्थ्यांची अवस्थांमध्ये खूप मोठा प्रादुर्भाव दिसून येतो याच बाबत जिल्हा परिषद प्रशालेला जर गुणवत्ता हवी असेल व पट संख्या हवी आसेल शिक्षण विभागाने एक पाऊल पुढेच उचलायला हवं दर्जेदार शिक्षण समूहाच्या माध्यमातून नविन पीढी घडवायची आसेल तर राजपत्रीत मुख्याध्यापकाची तात्काळ नेमनुक करून जिल्हा परिषद प्रशाला मुलांची येथे उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापकांना संधी देण्यात यावी .
राजपत्रित मुख्याध्यापक म्हणून कोणी आले तर शिक्षणाची गती वाढेल आणि शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मिळेल आणि शिक्षणाची वाट चाल चांगल्या पद्धतीने पुढे येईल यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा आणि शाळेला राजपत्रित मुख्याध्यापक तात्काळ द्यावा अशी मागणी नळदुर्ग शहरातून जोर धरत आहे शिवाय विद्यार्थाच्या पट संख्येत नक्कीच वाढ होईल यात शंका नाही .

चौकट

मुख्याध्यापक आणि पालक

मनाचा दृष्टीकोन विशाल व स्वच्छ ठेवल्यास तणाव निवळण्यास मदत होते
समाजाच्या आपल्या कडुन खुप मोठ्या आपेक्षा आसतात काही दैनंदिन कामकाजामुळे मानवाच्या मनावर तणाव येतो परंतू समोरच्या व्यक्तीला बोलताना आपल्या जीवावर बेतलेला तणाव पुर्ण कमी करून मन निकोप ठेऊन मनाची एकाग्रता आणि शुद्धता विशाल ठेवल्यास तणाव निवळण्यास मदत होते हे मुख्याध्यापका मध्ये आसायला हवे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!