
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने दोन दिवसांच्या वैचारिक मंथन शिबिराचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले असून, त्यात पटेल बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे मंत्री व नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेत्तृत्वाखाली जी भूमिका घेतली आहे ती देशासाठी, राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची आहे. वेळेचे भान राखून जो निर्णय घेतो तोच यशस्वी ठरतो. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय योग्य आहे. शरद पवार सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. १९७८मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले, नंतर १९८६ मध्ये परत काँग्रेसमध्ये परतले होते. तेव्हा त्यांनी प्रवाह बघूनच निर्णय घेतला होता. पुलोद सरकारमध्ये हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील आदी जनसंघाचे प्रमुख नेते त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. पक्षाच्या विचारांसोबत ठाम राहायचे होते तर तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळी निर्णय का बदलला, असा सवाल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना उद्देशून केला.
पक्षाच्या हितासाठी अजित पवारांनी जी भूमिका घेतली आहे. ती भूमिका आपल्याला यशस्वी करून दाखवायची आहे. त्यासाठी आधी आपले घर, आपला पक्ष मजबूत करायचा आहे. मग बाहेरची लढाई लढायची आहे. आपल्या नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. आपलेच जुने सहकारी प्रय़त्न करत आहेत. पण त्यामुळे अजित पवारांसाठी ठाम उभे राहायला हवे. या मंथन शिबिरातून जे विचार घ्याल त्याला अमलात आणा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत