नागपूरमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभा

The Buddhist Society of India
Society Reg.No:3227 Trust Reg.No.982(F)Mumbai

संस्थापक अध्यक्ष:डॉ.बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक:महाउपासिका मीराताई आंबेडकर
राष्ट्रीय कार्याध्यक्ष/अध्यक्ष समता सैनिक दल:

आद.डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर

शाखा-दक्षिण विभाग नागपूर

तथागत बुद्ध विहार येथे फाल्गुन पोर्णीमा संपन्न

नागपूर दि.25 मार्च 2024
बुद्ध धम्म हा वैज्ञानिक आहे.तो आचरणावर अवलंबून आहे.बरेचसे बौद्ध म्हणून घेणारे बुद्धधम्माच्या तत्वाप्रमाणे वागताना दृष्टीत पडत नाहीत.माणसाचे जसे आचरण असते तसे प्रतिबिंब समाजरुपी आरशावर पडत असते.
विशुद्धी मार्ग हा मन शुद्धीचा मार्ग आहे.प्रत्येक पोर्णिमे लाअष्टशील उपोसथ ग्रहण केले जाते.धम्म प्रवचने सांगितली जातात.पंचशीलाचा मार्ग जो स्विकारतो.त्याला पाच अडथळे येतात.हिंसा,चोरी,व्यभिचार,खोटे बोलणे,सुरापान.हा मार्ग मैत्री,दान,समानता,सत्य,प्रज्ञा,या गुणाने पुर्ण करतो.त्यालाच सन्मान प्राप्त होतो.
केंद्रीय शिक्षक आयु.देवानंद वानखेडे यांनी तथागत बुद्ध विहार प्रेरणा नगर येथे आयोजित धम्म प्रबोधनात आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. अध्यक्षस्थानी आयु.अंकुश गणवीर अतिथी,सचिव संस्कार आयु.नानाजी शेंडे,तागडे सर,आयुनी गयाबाई देवगडे होते. कोषाध्यक्ष आयु.धनंजय राजवंश,डॉ.तक्षील वासनिक, आयुनी ढबाले,बन्बोडे,आयु.खोब्रागडे,राहुल हुमणे,उपासक-उपासिका बहुसंखेने उपस्थित होते.आयु.गंगाधर कांबळे सचिव भा.बौद्ध महासभा नागपूर महानगर जिल्हा शाखा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तागडे यांनी उपस्थिताचे आभार मानले.सरणत्तय गाथेने कार्यक्रम संपन्न झाला.
आयु.देवानंद वानखेडे
उपाध्यक्ष प्रचार/पर्यटन
भारतीय बौद्ध महासभा नागपूर महानगर
जिल्हा शाखा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!