देव कसला धावून येतोय?

आजवरचा इतिहास आहे संकट समयी देव कधीच धावून आला नाही.
मुर्ख आणि लाचार लोक त्याची आस लावून आहेत.
मी अडिच हजार वर्षापासून चा इतिहास पहात आहे कोणत्याच संकटात देव भक्ताच्या काय कुणाच्याच मदतीला धावून आलेला नाही.
राम अंतर्यामी होता म्हणतात मग त्याला आपल्या पत्नीला राक्षस पळवून नेणार आहे हे कसे कळले नाही? प्रत्यक्षात कृष्ण महाभारताचे का? युद्ध रोखू शकला नाही.
एकलव्याचा अनितीने कापलेला अगंठा वाचवू का? शकला नाही.
भारतात 2000 वर्षापुर्वी 16 राज्ये होती ती आपआपसांत भांडत होती झगडत होती त्यांना कधी एक करू शकला नाही.
देवात चांगलं करण्याची ताकद आजवर तरी दिसली नाही. भारतावर हजारो आक्रमणं झाली करोडो हिंदू ची हत्या झाली देव काहीच करू शकला नाही.
अहो देवाची मंदिरे फोडली तोडली जमिनदोस्त केली तुळजापूरची देवी फोडली सोरटी सोमनाथ फोडला मथुरेचे मंदिर तोडले काशी विश्वेशराचे तुकडे केले पण एकदाही देव हे का? रोखू शकला नाही.
या देशावर शक कुषाण हूण ग्रीक मोगल सुलतान मंगोल फ्रेंच व इंग्रजांनी जोरदार आक्रमणं केली परंतु एका ही देवाने प्रतिकार केला नाही. वरिल सर्वांनी या देशावर राज्य केले संपत्ती लुटली बायका पळवल्या भ्रष्ट केल्या नासवल्या ठार केल्या हजारो लाखो भारतियांची कत्तल केली पण देव कधीच मदतीला नाही आला. उलट याच लोकांना चांगले वातावरण निर्माण झाले आणि देश पारतंत्र्यात गेला.
देवाचा आधार कुचकामी ठरला. बेभरवशाचा ठरला तरिही लोक देव देव करतात.
देवानी सतत धोकाच दिला आहे.
*पाच हजार वर्षापासुन भारतियांनीच भारतातील दिन दलीत गरीब लोकांवर अन्वनीत अत्याचार केले. खुप छळले भोळ्या भाबड्या लोकांना फसवले त्यांना कमी लेखून त्यांचे मानसिक शारिरीक सामाजिक आर्थिक शोषण केले. पण एकाही देवाला त्यांची दया का? आली नाही. की, एका ही देवाने हि विषमता मोडून नाही काढली.
उलट देवांची मंदिरे उभारली कोट्यवधी पैसा मंदिरांनी जमा केला तो सामाजिक कामासाठी न वापरता मुठभर लोकांच्या कल्याणासाठी वापरला. आज ही लुट चालू आहे.
परवा कोकण कोल्हापूर सांगली पाण्यात गेली हजारो निश्राप जनावरे बालके स्त्रिया मृत्युमुखी पडल्या घरं रिकामी झाली क्षणात होत्याचं नव्हतं झालं . त्यांना उभं करता करता पुढचा पावसाळा येईल सुध्दा तरीही आम्ही बोलणार वरचा बघतोय जो अस्तित्वातच नाही तो कोठून बघणार?
कुठं गेला देव का नाही मदतीला आला ?या देवाने का नाही रोखला पूर ,ती दरडी पडण्यापासून तो विठोबा कमरेवर हात ठेवून तसाच उभा राहीला .मंदिरे मशीदी चर्च सगळं पाण्याखाली गेलं अल्ला देव गाॅड काय टूरवर गेले आहेत का?.या पुरात मुस्लिम हिंदू ईसाई बौद्ध सगळे अडचणीत आले संकटात सापडले पण एकाचा ही धर्माचा देव धावला नाही.
कुठं आहेत स्वामी समर्थ भीऊ नकोस तूझ्या पाठीशी आहे म्हणणारे मदत करतानाही नाही दिसले.
कुठं आहेत साईबाबा कुठं आहेत गजानन महाराज.
का? संस्थानं आपल्या तिजो-या या पिडीत लोकांसाठी खाली करत नाहीत.
पहा.????????????????
देव हत्या रोखत नाही
देव बलात्कार रोखू शकत नाही.
देव अनाचार रोखू शकत नाही
देव शोषण रोखत नाही.
देव दुष्काळ रोखत नाही.
देव भ्रष्टाचार रोखत नाही
देव चोरांचा साथी आहे.
देव मंदिरात बसून पुजा-याचे आयते पोट भरत आहे.
का? तिरूपती बालाजी पंढरपूर अशा अनेक मंदिरांनी मदत पाठवली नाही. कोल्हापूर ची लक्ष्मी पाण्यात गेली व कोल्हापूर ची लक्ष्मीच घेवून गेली ज्या कोल्हापूर वासीयांनी एवढी पुजा सेवा करून देखिल हि आई आपल्या लेकरांना का? वाचवू शकली नाही.
हे जरा पुजारी भडव्यानां खडसावून विचारले पाहीजे.
नाम स्मरण करा म्हणणा-या हरिभक्तपरायण लोक जे रात्रंदिवस बोबंलत असतात त्यांना जाब विचारला पाहीजे.
कुठं आहे पांडुरंग कुठे झोपला आहे.
लहान लहान बालकांची मृत शरिरे पाण्यावर तरंगली हे देवाला दिसले नाही का?
कशाला राम मंदिर बांधायचा आपण अट्टाहास करत आहोत अख्खा महाराष्ट्राला राम म्हणायची वेळ आणली.
दिडशे वर्ष इंग्रजांनी 800 वर्ष मुस्लिमांनी व पाच हजार वर्ष सनातनी पांखडी व लबाड लोकांनी या देशातील गरिबांना लुटले मारले नासवले पण एका ही देवाने या गरिबांचा उद्धार नाही केला .
या गरिब दलीत जनतेला दिलासा माणसांनीच दिला.पण देवाने नाही.
*भगवान महावीर, गौतम बुद्ध , महात्मा बसवेश्वर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, छ.शिवराय, शंभू राजे, महात्मा फुले, शाहू महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
या महापुरूषांनी आपल्या आहुत्या बहुजनउद्धारासाठी दिल्या. हेच खरे देव आहेत.
परंतु ईश्वराने कधीही कूणालाही वाचवले नाही हा इतिहास आहे.
भारतिय युवकांनो तरूण तरूणींनो वास्तव जाणा व त्यात जगा. देव कधीच मदतीला येणार नाही
लक्षात ठेवा.
कर्मण्येवाधिकारस्तेमां
फलेषुकदाचन
कठोर मेहनत परिश्रमा
शिवाय यश नाही उद्धार नाही.
मानवता एकच धर्म जगात मोठा आहे
थोतांड कर्मकांडे ढोंगीपण सोडा.
जग विज्ञानवादी व वास्तवा कडे झेप घेत आहे टाळ्या वाजवने व घंट्या वाजवने बंद करा.
नमो बुद्धाय, जय अशोक,जय शिवराय,जय ज्योती,जय सावित्रीमाई, जयभीम,जय संविधान, जय भारत.
संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक व व्याखाते, सिडको नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत