भगवान बुद्धांची शिकवण-भाग १०२

आशय
तथागत बुद्धांनी दिलेला सन्मार्ग म्हणजे महान शोध असून एक प्रगत व मानवतेला तारणारी शिकवण आहे. ही शिकवण, हा सन्मार्ग म्हणजेच ‘बुद्धांचा धम्म’…
जग हे आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शीतयुध्दात कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. त्यात सर्वांचेच नुकसान आहे. म्हणून बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे. हीच विचारसरणी जगाला तारू शकते. ही विचारसरणी म्हणजे बुद्धांचा धम्म होय. म्हणून या धम्माचा जेवढा प्रचार आणि प्रसार होईल, तेवढे जग युद्धापासुन दूर व शांततेच्या नजीक जाईल.
बुद्धाने दु:ख मुक्तीचा मार्ग शोधून काढला. जगात दु:ख आहे व ते कसे नाहीसे करावे या समस्यांवर चिंतन करून त्यांना एक नवा मार्ग दिसला. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया आहे. भगवान बुध्द धम्मपदाच्या गाथेत म्हणतात,
“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा! सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं!!”
याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुध्दाची शिकवण आहे. म्हणून भगवान बुद्धांची ही शिकवण सर्वदूर पसरविण्याची नितांत गरज आहे. हाच आशय या लेखमालेत मांडला आहे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२४.३.२०२४
मो.९३२६४५०५०६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत