माणगाव परिषदेचा १०४ वा वर्धापन दिन : डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा टप्पा.
दैनिक जागृत भारत टीम च्या वतीने वर्धापन दिनानिमित्त माणगाव परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ज्ञात अज्ञात भीम सैनिकांना विनम्र अभिवादन..
कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे 21 आणि 22 मार्च, 1920 रोजी झालेल्या परिषदेला यावर्षी 104 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीसाठी ‘माईलस्टोन’ ठरणारी ही परिषद होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तुफान प्रस्थापितांना धक्का देणार हे या परिषदेमुळे निश्चित झाले. ही परिषद म्हणजे त्यांच्या सामाजिक चळवळीचा आरंभबिंदू ठरला. आंबेडकरांनी आपल्या भाषणात मुंबई इलाख्यातील अशाप्रकारची ही पहिलीच परिषद असल्याचे नमूद केले आहे.
या परिषदेतील राजर्षी शाहू महाराजांचे भाषण तसेच त्यांनी आपल्या संस्थानातील केलेली अस्पृश्य उध्दाराची कामे यांची माहिती देतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उज्ज्वल नेतृत्वाविषयी केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरली.
कारण, पुढील काळात राजर्षींचे ते भाकीत डॉ. आंबेडकरांनी खरे करून दाखविले. या ऐतिहासिक माणगाव परिषदेला आज 104 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारपरंपरा पुढे घेवून जाण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, याचे भान ठेवूया..!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत