“जिथं विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरु होतं” अश्या वल्गना करणारे स्वतःवर वाईट वेळ आल्यावर मात्र बरोबर विज्ञानाच्या आश्रयाला जातात. – आयु. डॉ. विजय रणदिवे
“इनर इंजिनियरिंग” सारख्या फॅन्सी नावाने आपले फालतू कोर्सेस भोळसट लोकांना लाखो रुपयात विकून अमाप संपत्ती जमा करणारा जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरूच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. स्वतःला शिवाचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारा हा भुरटा आपल्या आत्मकथेत स्वतःचं असं वर्णन करतो जसं काही हा मर्त्य मानव नसून अमर असं “शिवतत्व” आहे.
हे भुरटे ध्यानधारणेचे फायदे सांगताना अश्या काही थापा मारत असतात ज्या ऐकून मुर्ख लोकांच्या मनात असा समज निर्माण होतो जणूकाही ध्यान केल्याने तुम्हाला कधीच कोणताही शारीरिक मानसिक आजारच होणार नाही. ह्या खोट्या प्रचाराला बळी पडून लाखो रुपयात ह्यांचे कोर्सेस करणारे मंद्बुद्धी जीव भरपूर आहेत.
बायकोच्या हत्येचा आरोप, आदिवासींच्या जमीनी बळकावल्याचे आरोप ह्या सदगुरुवर आहेत. पण पैशाच्या बळावर अन लाखो अनुयायांच्या जोरावर हा तुरुंगात जाण्याऐवजी मोकाट आहे. निव्वळ स्युडोसाइन्टिफिक गोष्टी ठासून सांगत ह्यानं लाखो अनुयायी मिळवलेत. ह्या देशात तसंही विज्ञान म्हणजे फक्त शाळा कॉलेजात शिकवल्या जाणारा अन केवळ परीक्षेत पास होण्यापूरता अभ्यासला जाणारा विषय असल्याने ते वैज्ञानिक दृष्टिकोन वगैरे काय असतं ह्याच्याशी कुणाला काही घेणंदेणं नाही.
वैज्ञानिक म्हणवून घेणारा इथला एक राष्ट्रपती एका जादूगाराच्या पायात लोटांगण घेतो. प्रधानमंत्री एखाद्या धर्मगुरू सारखा वावरत असतो. मुख्यमंत्री आपल्या सरकारी बंगल्यावर बुवा बाबांना बोलावून कर्मकांड करवतो, रक्षामंत्री लडाऊ विमानांना लिंबु मिर्ची टांगतो. बरंच बरं आहे!
गळा फाडून फाडून स्तोत्र, चालीसा पठण करणाऱ्यांची मुलं आजारी पडली म्हणजे मग गाडीला पाय लावून हॉस्पिटलकडं धाव घेतात. विज्ञानाचे उपकार घेऊन बरे होतात अन बरे झाल्यावर नवस फेडायला परत देवळात जाऊन अंगठाछाप पुरोहितांना दक्षिणा देतात. इतके दांभिक अन पाखंडी असतात की ह्यांची कृतज्ञता कधीच विज्ञानासाठी नसते. हे स्वतःला विज्ञानापेक्षा सुपेरिअर समजतात. ह्या मूर्ख अंधभक्तांसाठी सध्या अमृतकाळ सुरु आहे. आता ह्यांची पैदास वाढतच जाणार आहे.
बर्बाद गुलिस्ता करने को बस एक ही उल्लू काफी था । हर शाख पे उल्लू बैठा है अंजाम-ए-गुलिस्ता क्या होगा?
✍???? डॉ. विजय रणदिवे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत