सोन्याने गाठला किमतीचा नवा उच्चांक..
मुंबई : सोन्याचे दर कितीही महागले असले तरी, प्रत्येक जण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सोनं खरेदी करत असतो. परंतु आता सोन्याच्या किमती अक्षरशः सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर म्हणजेच ६६,७७८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहेत. गुरूवारी २१ मार्च रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर एप्रिल सोन्याची फ्युचर्स किंमत ६६,१०० रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडली गेली आणि कमोडिटी मार्केटच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच ६६,७७८ रुपये प्रति १० ग्रॅमच्या इंट्राडे उच्चांकावर उसळली.
मार्च महिन्यात सोन्याच्या दरात वारंवार विक्रमी वाढ होत आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी नवीन सार्वकालिक उच्चांक बनवला होता, जेव्हा १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६५,६४६ रुपये झाली होती. तर या महिन्यात ५ मार्च २०२४ रोजी सर्वकालीन उच्चांक ६४,५९८ रुपयांवर पोहोचला होता, त्यानंतर दोन दिवसांनंतर ७ मार्चला इतिहास रचत सोन्याचा भाव ६५,०४९ रुपयांवर पोहोचला. MCX वर सोन्याची किंमत देशांतर्गत बाजारात नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत प्रति औंस २,२०० डॉलरच्या वर आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत