IPL क्रिकेट चा रणसंग्राम सुरू; सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा.
आयपीएलचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी (२२ मार्च) रोजी संध्याकाळी ६.३० पासून होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीग सुरू होणार आहे. शुक्रवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गेल्या मोसमातील चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. २२ मार्चला पहिला सामना होणार आहे. दरम्यान आयपीएल २०२४ चे नेत्रदीपक उद्घाटन केवळ क्रिकेटपटूंच्या फलंदाजीमुळेच होणार नाही, तर स्टार्सही आपल्या उपस्थितीने क्रिकेटच्या मैदानात भुरळ घालणार आहेत. आयपीएल २०२४चे उद्घाटन अगदी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या विषयी सांगणारी एक पोस्ट आयपीएलच्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, “टप्पा तयार झाला आहे, दिवे आणखी उजळले आहेत आणि टाटा आयपीएल २०२४ च्या उद्घाटन समारंभात तारे रंगमंचावर प्रकाश टाकण्यासाठी सज्ज आहेत. क्रिकेट आणि मनोरंजनाच्या या रोमांचक जुगलबंदीचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा”. दरम्यान या कार्यक्रमाला अनेक स्टार्स उपस्थित राहणार आहेत. ए.आर. रहमान आणि सोनू निगम त्यांच्या सुरेल आवाजाने सुरवातीला मोहिनी घालतील. आयपीएल २०२४ च्या उद्घाटन समारंभात, दिग्गज अभिनेते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्यांच्या नृत्याने लोकांचे मनोरंजन करणार आहेत.
या उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच समारंभाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲपवर पहायला मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत