गुजरात आणि दिल्लीतून “औरंगजेबी” वृत्ती महाराष्ट्रावर चाल करून येत आहे – संजय राऊत
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे.
“या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते, गुजरातचे राज्यकर्ते मोदी अथवा शाह असतील. महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तिथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येतेय आणि शिवसेनेच्या विरोधात, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असंही ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनता निवडणुकीतून उत्तर देत मोदींच्या अमपानाचा सूड घेईल असा विश्वासही व्यक्त केली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत