मुस्तफा सुलेमान मायक्रोसॉफ्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
AI तंत्रज्ञानाशी निगडित व्यवसायाला नवीन दिशा देणार..
नवी दिल्ली : जगतातील दिग्गज टेक (तंत्रज्ञान) कंपनी मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial intelligence) व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुस्तफा यांनी टेक क्षेत्र गाजवत मोठी झेप घेतली. मुस्तफा सुलेमान यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन याबाबत माहिती दिली. आता मुस्तफा यांनी टीम मायक्रोसॉफ्टला AI प्रोडक्ट्स तयार करुन देईल. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात या प्रकल्पाला मुस्तफा नवीन दिशा देतील असे अपेक्षित आहे.
मुस्तफा सुलेमान यांचे वडील सीरियन वंशाचे टॅक्सी चालक होते तर आई ब्रिटनमधील रुग्णालयात परिचारिका होती. अगदी सामान्य पार्श्वभूमीतून आलेले मुस्तफा आज जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या एआय युनिटचे सीईओ बनले.
मुस्तफा सुलेमान यांचा जन्म १९८४ मध्ये झाला. मुस्तफाचे सुरुवातीचे शिक्षण ब्रिटनमध्ये झाले त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला गेले, मात्र त्यांनी दुसऱ्या वर्षी शिक्षण सोडून मुस्लिम युथ हेल्पलाइन सुरू केली. ब्रिटनमधील मुस्लिमांसाठी ही सर्वात मोठी मानसिक आरोग्य सहाय्य सेवा बनली आहे.
मुस्तफा सुलेमानने २०१० मध्ये अशा काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करण्यास सुरुवात केली, जेव्हा जगातील बहुतेक लोकांना याची माहितीही नव्हती. मुस्तफाने मित्रासोबत AI स्टार्टअप, AI Lab Deep Mind नावाने कंपनीची सुरुवात केली. Lab Deep Mind मायक्रोसॉफ्टच्या एआयला टक्कर देणारी एक मुख्य कंपन्यांपैकी एक होती ज्याचा सुरुवातीनंतर गुगलने अधिग्रहण केले आणि सुलेमान यांनी गुगलमध्ये AI प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत