ICAI; चार्टर्ड अकाउंटंट्स परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर.

भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था म्हणजेच, आयसीएआय (ICAI) ने मे २०२४ मध्ये होणाऱ्या CA परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. सीए इंटरमीडिएट परीक्षा २०२४ (CA Intermediate) आणि CA Final Exam 2024 साठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
भारतभरातील १८ व्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, मे २०२४ च्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता त्यांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
जे विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटन्सी इंटरमिजिएट आणि अंतिम मे २०२४ च्या परीक्षेला बसणार आहेत ते आता सीए परीक्षा मे २०२४ चे सुधारित वेळापत्रक पाहू शकतात. सदर सूचना ICAI च्या icai.org या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संपूर्ण वेळापत्रकही या बातमीत देण्यात आले आहे.
परीक्षांच्या तारखा पुढील प्रमाणे
सीए इंटर ग्रुप १ परीक्षा : ३, ५ आणि ९ मे २०२४
सीए इंटर ग्रुप २ परीक्षा : ११, १५, आणि १७ मे २०२४
सीए फाइनल ग्रुप १ परीक्षा : २, ४ आणि ८ मे २०२४
सीए फाइनल ग्रुप २ परीक्षा : १०, १४ आणि १६ मे २०२४
इंटरनेशनल टैक्सेशन असेसमेंट टेस्ट (आंतरराष्ट्रीय कर निर्धारण चाचणी)ची तारीख : १४ आणि १६ मे २०२४
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की वरील परीक्षेच्या वेळापत्रकात नमूद केलेल्या तारखांपैकी कोणत्याही तारखेला केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार / स्थानिक प्राधिकरणाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली तरी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत