श्रीकांत शिंदेंची उमेदवारी धोक्यात; भाजपा च्या ४०० पार लक्षासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे बावांकुळेंना पत्र

ठाणे (कल्याण) : कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. यामुळे कल्याण लोकसभेत भाजप आपला उमेदवार उतरवणार की काय या चर्चांना उधाण आलं आहे. तस झाल्यास मुख्यमंत्री पुत्राला आपली जागा सोडावी लागणार आहे.
याबाबत भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले की कल्याण लोकसभेत भाजपचे ३ आमदार आणि एक मंत्री आहे. तसेच कल्याण-डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला आहे. कल्याण ग्रामीण, दिवा शहरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते जोमाने काम करत आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कल्याण लोकसभेची निवडणूक कमळ या चिन्हावर लढवावी. कमळ हे चिन्ह घेऊव हे स्वप्न पूर्ण होईल. इतर कोणत्या पक्षाच्या चिन्हाने हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं भोईर यांनी पत्रात लिहिलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत