ST महामंडळाला आचारसंहिता नाही का ??
अकोला : महाराष्ट्रासह राज्यभरातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याचसोबत आचारसंहितादेखील जाहीर झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते सरकारी आस्थापनांनी याचे पालन करणे अपेक्षित असते. पण अनेकदा सरकारी आस्थापनांना याचा विसर पडल्याचे दिसून येते.
अकोल्यामध्ये असेच दृश्य दिसून आले आहे. अकोला पश्चिम विधानसभेत आगामी लोकसभा तसेच पोट निवडणुकीची तयारी सुरु आहे. अकोला जिल्हासह रिसोड मतदार संघात 16 मार्च पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता सुरु असताना विविध राजकीय पक्षाचे बॅनर, फ्लॅक्स, तसेच राजकीय पुढाऱ्यांचे बोर्ड काढणे किंवा झाकणे आवश्यक असते. पण असे होताना येथे दिसत नाही. त्यामुळे अकोला महानगरपालिका तसेच नगरपालिकेने यावर कारवाईचा बडगा उगारलाय.
प्रत्येक विभागाला शासनाच्या जाहिराती आणि प्रसिद्धी करणारे फलक झाकणे बंधनकारक आहे. असे असताना राज्य मार्ग परिवहन विभागाला कोड ऑफ कंडक्टचा विसर पडला असल्याचा दिसून येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत